Homeकल्चर +एनएफडीसी स्क्रीन रायटर्स...

एनएफडीसी स्क्रीन रायटर्स लॅबने निवडले ८ प्रतिभावंत पटकथालेखक!

एनएफडीसी स्क्रीनरायटर्स लॅबच्या 16व्या आवृत्तीसाठी जादुई वास्तवता, कल्पनाविश्व, भय/थरार, महिला सक्षमीकरण, सीमेपलीकडील राजकारण, एलजीबीटीक्यू+ मुद्दे आणि मानसिक आजार या विषयांवर आधारित पटकथालेखनाच्या 8 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.

देशभरातील खऱ्या प्रतिभेचा विकास करण्यासाठी, जोपासना करण्यासाठी आणि गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. निवड झालेले हे 8 पटकथालेखक जाहिरातपट, लघुपट, माहितीपट आणि फीचर फिल्म्स यांचे देखील निर्माते आहेत  आणि त्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी, ऊर्दू, मलयाळम, बंगाली, ओडिया आणि तिबेटी या भाषांसह विविध भाषांमध्ये लिहिलेल्या पटकथांची निवड झाली आहे. यापैकी दोन लेखक सर्वोत्तम मराठी चित्रपट आणि सर्वोत्तम छायालेखनकला यासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत.

एनएफडीसीमध्ये असलेल्या आम्हाला अगदी ठामपणे असे वाटते की एखादा चित्रपट यशस्वी ठरण्यासाठी लक्षवेधी कथानक, खिळवून ठेवणारी पात्रे आणि अर्थपूर्ण संवाद या सर्वांचा पाया हा अतिशय उत्तम पद्धतीने लिहिलेल्या पटकथेद्वारे घातला जातो, असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी सांगितले. चित्रपट उद्योगातील कल आणि पद्धती लक्षात घेऊन आम्ही लेखकांना वैशिष्ट्यपूर्ण कथांचा चांगल्या प्रकारे विकास कसा करायचा हे तर शिकवतोच पण त्याचबरोबर त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय निर्माते आणि गुंतवणूकदार यांच्यासमोर यशस्वीरित्या कसे सादर करायचे हे देखील शिकवतो, अशी माहिती त्यांनी दिली.

तीन भागांमध्ये होणारी ही अतिशय सखोल प्रशिक्षण असलेली कार्यशाळा म्हणजे वार्षिक कार्यक्रम असून उदयोन्मुख आणि प्रस्थापित पटकथालेखकांना भारतभरातील आणि जगातील नामवंत  पटकथालेखकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पटकथा संपूर्णपणे विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देते.

.एनएफडीसी

यावर्षीच्या मार्गदर्शकांमध्ये एनएफडीसी पटकथा लेखकांचे संस्थापक लॅब मार्टेन रबार्ट्स (न्यूझीलंड), क्लेअर डॉबिन (ऑस्ट्रेलिया), बिकास मिश्रा (मुंबई) आणि केतकी पंडीत ( पुणे) यांचा समावेश आहे.

मूल्यांकनकर्त्यांमध्ये मेलानी डिक्स, सिंथिया केन, ग्यान कोरिया, आर्फी लांबा, सिद्धार्थ जातला, उदीता झुनझुनवाला आणि कचन कालरा यांच्यासारख्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटकार, निर्माते आणि पत्रकारांचा समावेश आहे.

2023 स्क्रीनरायटर्स लॅब मध्ये निवड झालेले सहभागी आणि प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे आहेत ( अकारविल्हे, शेवटच्या नावाने):

  • अविनाश अरुण- “बूमरँग”( किल्ला साठी सर्वोत्तम मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
  • संजू कडू– “कोसला (द ककून)”
  • रोहन के. मेहता – “ऍब्सेंट”
  • नेहा नेगी – “छावणी (कँट)”
  • वत्सला पटेल – “दांत (चावा)”
  • बिस्व रंजन प्रधान – “प्रमाण पत्र”
  • दिवा  शाह – “छब (निर्वासित)”
  • सविता सिंग – “बॅलेड ऑफ द सर्कस” (सर्वोत्तम छायालेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता)

एनएफडीसी स्क्रीनरायटर लॅबमधून बाहेर पडलेल्या यापूर्वीच्या पुरस्कार विजेत्या प्रकल्पांमध्ये लंच बॉक्स (रितेश बत्रा), लिपस्टीक अंडर माय बुरखा (अलंकृता श्रीवास्तव), दम लगा के हैशा (शरत कटारिया), तितली (कानू बहल), शब (ओनीर), ए डेथ इन द गूंज (कोंकोणा सेन शर्मा), आयलँड सिटी (रुचिका ओबेरॉय), बॉम्बे रोझ (गितांजली राव) आणि चुसकित(प्रिया रमासुब्बन) यांसारखी काही नावे समाविष्ट होती.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content