Homeएनसर्कलरॅकोल्‍डकडून ओम्‍नीस व...

रॅकोल्‍डकडून ओम्‍नीस व अॅल्‍ट्रो वॉटर हिटर्स लाँच

रॅकोल्‍ड या भारतातील आघाडीच्‍या होम अप्‍लायन्‍स ब्रॅण्‍डने वॉटर हिटर्सच्‍या प्रिमिअम श्रेणीच्‍या लाँचसह वॉटर हिटिंग क्षेत्राला नव्‍या उंचीवर नेले आहे. ब्रॅण्‍डने वॉटर हिटर्सच्‍या नवीन ओम्‍नीस व अॅल्‍ट्रो श्रेणींच्या बहुप्रतिक्षित २०२३ एडिशन्‍सना लाँच केले आहे.

वॉटर हिटर्सची ही नवीन श्रेणी इटलीमध्‍ये प्रतिष्ठित इटालियन डिझाइन उंबेर्तो पालेर्मो यांनी डिझाइन केली आहे. या आकर्षक डिझाइन्‍स शहरी बाथ स्‍पेसेसच्‍या इंटीरिअर्सना साजेशा असून सुशोभित करतात. या अत्‍याधुनिक ऑफरिंग्‍जमधून नाविन्‍यपूर्ण, आधुनिक व ऊर्जा-कार्यक्षम वॉटर हिटिंग सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती रॅकोल्‍डची अविरत कटिबद्धता दिसून येते.

नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या वॉटर हिटर्सचा नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये व सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांच्‍या विविध गरजा व सर्वसमावेशक पसंतींची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. हे वॉटर हिटर्स सोयीसुविधा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि बाथिंगचा आनंद देण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहेत.

एरिस्‍टन ग्रुप इंडिया प्रा.लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व कंट्री मॅनेजर (भारत) मोहित नरूला म्‍हणाले की, रॅकोल्‍ड ६० वर्षांपासून दर्जा व नाविन्‍यतेसाठी प्रसिद्ध आहे. आम्‍ही ग्राहकांच्‍या गरजा, तसेच त्‍यांच्‍या सर्वसमावेशक खरेदी व वापर करण्‍याच्‍या पद्धती समजून घेण्‍याकडे अधिक लक्ष देतो. अशा संधोशनांमधून आम्‍हाला योग्‍य उत्‍पादन विकसित करण्‍यास मदत झाली आहे. वॉटर हिटर्सची नवीन श्रेणी आधुनिक ग्राहकांच्‍या प्रमुख समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आमचे वॉटर हिटर्स सर्वोत्तम ऊर्जा कार्यक्षमता आणि सुधारित सोयीसुविधा देण्‍यासह सर्वोत्तम नियंत्रण देखील देतात. अवंत-गार्डे वैशिष्‍ट्यांमध्‍ये वॉईस कंट्रोल, आयओटी-सक्षम स्‍मार्ट अॅप-आधारित कंट्रोल, डिजिटल डिस्‍प्‍ले आणि प्रगत मायक्रोप्रोसेसर-आधारित वैशिष्‍ट्ये जसे ऑटो डायग्‍नोसिक्‍स अशा इतर अनेक वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. नवीन ओम्‍नीस श्रेणी आपल्‍या विद्यमान पोर्टफोलिओसह ५-स्‍टार बीईई रेटिंग देते, जी वापरकर्त्‍यांसाठी वीजेची बचत करेल आणि यामधून शाश्‍वत व सर्वसमावेशक विकासासाठी सर्वात ऊर्जा-कार्यक्षम उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content