Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज नवा आठवडा, नवा टास्क!

नुकतीच बिग बॉसची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानऊघडणी केली. काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले गेले. काही सदस्य घरामध्ये दिसत नसून त्यांनी सुरू होणार्‍या आठवड्यात त्यांचे मत मांडावे असे सांगितले गेले. आता सुरू झाला आहे नवा आठवडा..

नव्या आठवड्यामध्ये रंगणार नवा टास्क. “जोडी की बेडी”.. या आठवड्याची ही थीम असून, या थीमच्या अंतर्गत नवा टास्क रंगणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये तसे दिसते आहे. बिग बॉसने सदस्यांना घरात एकटं फिरण्यास बंदी केली आहे. इथून पुढे संपूर्ण आठवडाभर नेमून दिलेल्या जोडीदारासोबतच सदस्यांना पूर्ण वेळ खेळ खेळावा लागणार आहे.

बिग बॉसने हे जाहीर करताच सदस्यांचे चेहरे पडले. आता या जोड्या कोणत्या असणार? या टास्कमध्ये नक्की काय घडणार? हे कळणार आहे आजच्या भागामध्ये.

शनिवार–रवीवारमध्ये पार पडलेल्या बिग बॉसच्या चावडीमध्ये बेस्ट मालकीण स्नेहा वाघ ठरली. वर्स्ट मालकीण ठरली ती शिवलीला.. बेस्ट सेवक ठरला विशाल तर वर्स्ट सेवक ठरला आविष्कार. याचसोबत उत्कर्ष टीम आणि दादुस टीम यांच्यामध्ये जुगलबंदीही रंगली. स्नेहा, आविष्कार, सुरेखा कुडची, तृप्ती, मीनल शाह आणि जय यांनी काही सदस्यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. तर विशाल, विकास, उत्कर्ष आणि सुरेखा कुडची यांना त्यांच्या चाहत्यांनी वूट चुगलीतर्फे पाठवलेली चुगली ऐकवली.

या आठवड्यात कोणाचा आवाज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घुमणार? कोण गाजवणार हा आठवडा? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार? कोण होणार सेफ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक दिवशी नाती बदलतात. कधी मैत्री होते तर कधी त्याच व्यक्तीशी भांडणदेखील होतं. कधी वैर तर कधी त्याच व्यक्तीशी जुळवून घ्यावे लागते. जोड्या दर आठवड्यात बदलतानादेखील दिसतात. पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा आणि गायत्री. यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी सुनावलेदेखील..

मीराच्या मागे मागे करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठेतरी मागे पडतोय. मीरा आणि गायत्री आज स्नेहाविषयी बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये, मीरा गायत्रीला म्हणते, “स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुप मध्येमध्ये कीडे करते आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते.. आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाहीये.

गायत्री म्हणते, “स्नेहा मानत नाही तिने असं काही केले. मी स्नेहाशी बोलायला गेले. ती म्हणाली, म्हणजे मी काय करू? मी तिला म्हणाले माझं तुला सांगणं आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपलं रिलेशन जर चांगलं राहायला हवं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखाताईंनादेखील तसंच वाटलं होतं. आम्ही सगळे बसलो होतो. त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केलं. स्नेहा माझ्याशी आधी बोलली असती असं काही आणि मी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली असती तर ठीक होतं.. मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहाने तो मुद्दा काढायलाच नको. तिच्या तोंडातून दोन शब्द नाही निघत कधी.. आज पहिल्यांदा मी तिचा आवाज इतका ऐकला इतका..”.

आता हा मुद्दा अजून किती ताणला गेला? पुढे अजून काय काय झालं?

बिग बॉसच्या घरात कोण कोणाच्या बाजूने आहे हे कळणं जरा कठीणच असतं. कोणता सदस्य कोणाच्या बाजूने वा कोणत्या ग्रुपला जॉइन होईल हे सांगता येत नाही. हे मात्र खरं की, आपण ज्यावर जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ती कधी तुमच्या विरोधात जाईल हे कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सदस्यांना खूप सतर्क राहावं लागतं.

शिवलीला, विकास आणि मीनल यांची चर्चा आज चांगलीच रंगणार आहे. मीनलच्या मनातला प्रश्न ती आज शिवलीला आणि विकाससमोर मांडताना दिसणार आहे. सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने आहेत हेच कळत नाहीये. एवढं त्यांना तोंडावर सांगितलं तरीपण त्यांच्याशी गुलूगुलू बोलत आहेत. यांचं संभाषण ऐकून हा प्रश्न नक्कीच पडू शकतो की, घरामध्ये दोन ग्रुप तर नाही ना तयार होत आहेत? वा बनले आहेत?

शिवलीलादेखील त्यांची स्ट्रॅटेजी मांडताना दिसणार आहेत. त्या म्हणाल्या, “मोठी स्ट्रॅटेजी ही आहे, की आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या ग्रुपमधले सदस्य कमी केले पाहिजे. हीच सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आहे. कोण आणि कसं कमी करायचं ते ठीक आहे ते नंतर बघता येईल.

सगळयात महत्त्वाचा मुद्दा काय, पुढची माणसं आहेत ना.. आधी ती धडाधडा पाडा आणि पाडताना विचार करा.. जो पडणार नाही त्याला पाडू नका, जो कडेवर उभा आहे त्याला पाडा. काही काही लोकं अशी आहेत जो दोन्ही नावेत पाय टाकून प्रवास करत आहेत. त्यांना पण कळू देत की ही माणसं कशी आहेत ते..”

आता ती लोकं कोणती? कुठला ग्रुप? नक्की कोणाबद्दल हे बोलत आहेत?

“तू आमच्याकडून खेळणार आहेस की नाही”? हा प्रश्न वेगवेगळ्या पध्दतीने सदस्य एकमेकांना विचारताना आपण सगळ्यांनीच ऐकला आहे. असंच काहीसं आज घरामध्ये घडताना दिसणार आहे. गायत्री आणि विकासमध्ये एक चर्चा बराच काळ रंगणार आहे. ज्यामध्ये विकास गायत्रीला सांगताना दिसणार आहे, “बघूया आता काय होतं, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे? की त्यांना वेगळया दोन टीम तयार करायच्या आहेत? आणि जर ते तसं करणार आहेत तर कुठल्या पद्धतीने होणार आहे? जेव्हा ते समजेल तेव्हा पिक्चर क्लियर होईल. आणि या सगळ्यात आपल्या दोघांमधलं जे पर्सनल बाँडिंग आहे ते अजिबात बदलणार नाही, हा मी तुला शब्द देतो. गायत्री त्याला विचारताना दिसणार आहे, “Should we count in ऑर out”? त्यावर विकास म्हणाला “मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. गायत्री त्यावर म्हणाली, “म्हणजे या आठवड्यासाठी we should count you out”.

काय असेल विकासची strategy? नक्की काय करणार आहे विकास? ते लवकरच कळेलच. बघत राहा बिग बॉस मराठी.. कलर्स मराठीवर..

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content