Homeकल्चर +डेनिस टिटो पहिला...

डेनिस टिटो पहिला व्यावसयिक अवकाशयान प्रवासी!

डेनिस टिटो हा पहिला व्यावसयिक अवकाशयान प्रवासी मानला जातो. त्याच्या आधी संशोधन कार्यासाठी फक्त अंतराळवीर अवकाशात गेले होते. टिटो एप्रिल 2001मध्ये रशियाच्या सोयुझ टीएमए प्रक्षेपक वाहनातून अवकाशात गेला होता. त्यानंतर सन 2002 ते 2009 या कालावधीत मार्क शटलवर्थ, ग्रेग ओल्सेन, अनौश अन्सारी, चार्ल्स सिमॉनी, रिचर्ड गॅरियॉट, गायलालिबर्टे या सर्वांनी अवकाशात सशुल्क प्रवास केला, अशी माहिती मुंबईतल्या व्ही. एम. वैद्यकीय केंद्रातील अवकाशसंबंधी वैद्यकीय तज्ञ डॉ. पुनिता मसरानी यांनी दिली.

भारतीय वैमानिकी संस्थेच्या मुंबई शाखेच्या सहकार्याने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राने “अंतराळ पर्यटन: भविष्यातील झेप” या विषयावर ऑनलाईन पद्धतीने नुकतेच व्याख्यान आयोजित केले. त्यात डॉ. पुनिता मसरानी बोलत होत्या. त्यांनी या व्याख्यानात व्यावसायिक पातळीवरील अवकाश प्रवासाचे विविध पैलू स्पष्ट केले.

अवकाश पर्यटन किंवा व्यावसायिक पातळीवरील अवकाश प्रवासाची संकल्पना आता नवी राहिलेली नाही.  या ऑनलाईन व्याख्यानात डॉ. पुनिता यांनी या कल्पनेच्या जन्मापासून ती प्रत्यक्षात येईपर्यंतचा सर्व इतिहास उलगडून सांगितला. व्यक्तिगत मालकीच्या रॉकेट्स आणि अवकाशयानाचा वापर करून अमेरिकेचे दोन अब्जाधीश, रिचर्ड ब्रॉन्सन आणि जेफ बेझोज, अवकाशात पर्यटक म्हणून फेरी मारून आल्यामुळे गेल्या काही काळात अवकाश पर्यटन चर्चेत आले आहे.

स्पेस अॅडव्हेंचर्स ही अवकाश पर्यटन क्षेत्रातील पहिली संस्था

यापूर्वी नासा आणि रशियाच्या अवकाश संस्थेने पर्यटकांसाठी अवकाश प्रवासाची सुविधा सुरू केली होती. मात्र ती अतिशय खर्चिक असून सर्व प्रक्रियादेखील अत्यंत कठोर होती. रशियाचे सोयुझ अवकाशयान दर सहा महिन्यांनी पर्यटकांना अवकाशात घेऊन जात असे. स्पेस अॅडव्हेंचर्स ही अवकाश पर्यटन क्षेत्रातील पहिली संस्था होय. अमेरिकी अब्जाधीश रिचर्ड गॅरियॉट यांनी 1998मध्ये ही संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे लोकांना शुल्क घेऊन रशियाच्या सोयुझ रॉकेटमधून सवारीची सुविधा मिळत असे अशी माहिती त्यांनी दिली.

नासा आणि रशियाच्या अवकाश संस्थेने अवकाश पर्यटनाचा कार्यक्रम बंद केल्यानंतर उद्योजक आणि व्यावसायिकांना वाटले की, ते अवकाश प्रवासाची सुविधा सुरू करू शकतात. त्यामुळे जेणेकरून अधिकाधिक लोकांना अवकाशात फिरून येता येईल आणि यातूनच अवकाश पर्यटनाच्या संकल्पनेने जन्म घेतला असे डॉ. पुनिता म्हणाल्या.

खासगी अवकाश प्रवासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांची माहितीदेखील त्यांनी यांनी दिली.

ब्लू ओरिजिन कंपनीची स्थापना अमेझॉनचे अध्यक्ष जेफ बेझोज यांनी केली. ब्लू ओरिजिनचे न्यू शेफर्ड नामक पुनर्वापर करता येणारे रॉकेट नुकतेच चार खासगी नागरिक पर्यटकांना घेऊन अवकाश फेरी पूर्ण करुन आले. त्यात जेफ बेझोज, मार्क बेझोज, वॅली फंक आणि ऑलिव्हर दाएमेन यांचा समावेश होता. न्यू शेफर्ड रॉकेटने अमेरिकेतील पश्चिम टेक्सासहून 20 जुलै 2021ला उड्डाण केले, असे त्या म्हणाल्या.

टेसला मोटर्सच्या एलॉन मस्कने 2002मध्ये स्पेस एक्स ही अमेरिकेतील अवकाशयान निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्यासाठी नासाच्या अंतराळवीरांनी जे ड्रॅगन अवकाशयान वापरले ते याच कंपनीने निर्माण केले होते. नागरिकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर 10 दिवसांच्या सशुल्क सहलीसाठी पाठविण्याची योजना स्पेस एक्स आखत आहे. ही कंपनी चंद्र आणि मंगळावर अवकाश सहलींचे आयोजन करण्याचा विचार करत आहे, असेही डॉ. पुनिता यांनी सागितले.

ब्रिटीश व्यावसायिक रिचर्ड ब्रान्सन यांनी 2004मध्ये वर्जिन गॅलॅक्टिक ही कंपनी स्थापन केली. रिचर्ड ब्रान्सन आणि त्याच्या कर्मचारीवर्गाने नुकतेच वर्जिन गॅलॅक्टिक रॉकेट विमानातून न्यू मेक्सिको येथून 50 मैल उंचीवर झेप घेतली आणि ते सुरक्षितपणे परत आले. अर्थात या सर्व मोहिमा अवकाशात फेरी मारून येण्याच्या आहेत. पण, नासाने नुकतीच खासगी पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर छोट्या भेटीवर नेण्यासाठी परवानगी दिली आहे. अॅक्सिऑम स्पेससारख्या कंपन्या खासगी अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहेत. ही कंपनी खासगी अंतराळ स्थानकाच्या निर्मितीचेदेखील नियोजन करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. पुनिता यांनी ऑर्बीटल फ्लाईट्स, सब-ऑर्बीटल फ्लाईट्स, लो अर्थ ऑर्बीट्ससारख्या अवकाश प्रवासाशी संबंधित मूलभूत संज्ञांचीदेखील माहिती दिली.

फेडरेशन एयरॉनॉटिक इंटरनॅशनली या संस्थेनुसार समुद्रसपाटीपासून 100 किमीपेक्षा जास्त उंची म्हणजेच कारमन रेषेपलीकडचा भाग म्हणजे अवकाश. हीच संस्था समुद्रसपाटीपासून 50 मैल (80.47 किमी) या उंचीवर अवकाश यानांसाठी पात्रता उंची असल्याचे सांगते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणजे पृथ्वीच्या कमी उंचीवरील कक्षेत स्थापन केलेले सुविधायुक्त अवकाश स्थानक होय. हे स्थानक 1998मध्ये स्थापन करण्यात आले. हा बहुराष्ट्रीय सहयोगात्मक प्रकल्प असून त्यात नासा (अमेरिका), रॉसकॉसमॉस (रशिया), जाक्सा (जपान), ईएसए (युरोप) आणि सीएसए (कॅनडा) या पाच अवकाश संशोधन संस्थांचा समावेश आहे, असे त्या म्हणाल्या. 

अवकाश पर्यटनातील धोका, जाणीव जागृती, चिंतेच्या बाबी आणि माहितीपश्चात वैद्यकीय मंजुरी या अत्यावश्यक भागांसह यात गुंतलेल्या वैज्ञानिक घटकांची डॉ. पुनिता यांनी चर्चा केली. या सफरीवर जाऊन आल्यानंतर उद्भवू शकणाऱ्या वैद्यकीय समस्या तसेच मानवी शरीर आणि मेंदू यांच्यावर अवकाश प्रवासाचा होणारा परिणाम याबद्दलही डॉ. पुनिता यांनी तपशीलवार माहिती दिली.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content