Homeमुंबई स्पेशलमुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य...

मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य हवे तर…

मुथ्थुट फायनान्स लि., या भारतातील सर्वात मोठ्या सुवर्ण कर्ज पुरवठादार कंपनीने दिल्लीतील मुथ्थुट विवाहसन्मान प्रकल्पासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. २०२३ पॅजंट, हा अनोखा सीएसआर उपक्रम असून त्याद्वारे विधवांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. हा उपक्रम डिसेंबर २०२३दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. खाली नमूद केलेल्या कागदपत्रांसह अर्ज पुढे दिलेल्या पत्त्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला ५०,००० रुपयांचे भरघोस आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. बेंगळुरू, हैद्राबाद, मेंगलोर, मदुराई, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली व मुंबई अशा आठ ठिकाणचे प्रत्येकी १० लाभार्थी व असे ८० लाभार्थी निवडले जाणार आहेत. त्यासाठी पात्र ठरण्यासाठी लाभार्थीचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुथ्थुट फायनान्सद्वारे मुथ्थुट विवाहसन्मान प्रकल्प २०२३साठी एकूण ४० लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून त्याद्वारे कंपनी आपली बांधिलकी नव्याने अधोरेखित करणार आहे.

कंपनीने यापूर्वी विधवा मातांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी १५ कोटींचे योगदान दिले आहे. या उपक्रमाचे सहकार्य लाभलेले विवाह १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान संपन्न होणार आहेत. हा प्रकल्प मुथ्थुट फायनान्सच्या समाजाला सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेतला महत्त्वाचा भाग आहे.

या निधीविषयी मुथ्थुट फायनान्सचे सीएसआर प्रमुख बाबू जॉन मल्याळी म्हणाले की, ‘लग्नामुळे एखाद्या कुटुंबावर किती ताण येतो याची आम्हाला कल्पना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटापुढे अशा परिस्थितीत किती मोठे आव्हान उभे राहते हे आम्हाला माहीत आहे. विधवा मातांना आर्थिक मदत करून आम्ही हा आर्थिक ताण कमी करण्याचे व नववधूंना कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय त्यांच्या स्वप्नातला लग्न समारंभ अनुभवता येईल याची खात्री करणार आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुथ्थुट फायनान्स नववधूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे योगदान देणार असून त्यांना कोणत्याही आर्थिक बोज्याशिवाय लग्नाचा आनंद घेणे शक्य होणार आहे.’

हे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी पात्र मुलींच्या मातांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. 

1. पांढऱ्या कागदावर मुथ्थुट फायनान्सच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे विनंतीपत्र

2. स्थानिक नगरसेवक/पंचायत सदस्य/आमदार यांच्याकडून शिफारसपत्र

3. लग्नाची तारीख दर्शवणारे पत्र किंवा लग्नपत्रिका किंवा अर्जाची वैधता दर्शवणारे इतर कोणतीही कागदपत्रे

4. रेशन कार्ड आणि आधार कार्डाची प्रत

5. उत्पन्नाचा दाखला

6. मुलीची आई विधवा किंवा एकल माता असल्याचे दर्शवणारा मृत्यूचा दाखला किंवा इतर कागदपत्र 

नमूद केलेल्या कागदपत्रांसह अर्ज पुढे दिलेल्या पत्त्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अर्जाच्या पाकिटावर ‘लग्न भेटीसाठी अर्ज’ असे लिहिलेले असावे. 

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता– 

सोनू गौंड, व्यवस्थापक सीएसआर, मुथ्थुट फायनान्स लि. 

स्वामी विवेकानंद रस्ता, नवी कॉलनी, मामलेदारवाडी

सारस्वत बँकेच्यावर, मालाड पश्चिम, मुंबई-400064

दूरध्वनी क्र.- 9773507004

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content