Homeकल्चर +'नवरा माझा नवसाचा...

‘नवरा माझा नवसाचा – २’ २० सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर

सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा”, या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच “नवरा माझा नवसाचा – २” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

एस टी बस प्रवासात “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता “नवरा माझा नवसाचा – २” चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते. ‘सुश्रिया चित्र’ची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा – २” या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.

चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजरदेखील यावेळी सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय “नवरा माझा नवसाचा” चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता “नवरा माझा नवसाचा – २”मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत. 

“नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा – २”मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पाहयला लागणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content