नेहरू युवा केंद्र वर्धा (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) द्वारा वर्ध्याच्या इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे काल राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, विवेक देशमुख, डॉ. अभिजित वेरुळकर, डॉ. ए. व्ही. ससनकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रामदास तडस यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रवर प्रकाश टाकून त्यांच्याबद्दल युवकांना प्रेरित केले. तसेच रामदास आंबटकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नियमावर चालून युवकांनी त्यांची ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका असे युवकांना संबोधित केले.
वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्याकडून चंदु खोंडे व रियाज खान यांनी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह बद्दल माहिती देऊन वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे सांगितले.
जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा विजेता वेदांत रोकडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भाषण दिले. सर्व मान्यवरांनी नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण बघितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन न्यू आर्ट कॉलेजचे प्राध्यापक पेठारे यांनी मानले.
नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोशन सयाम, आकाश मेलेकर, आकाश चौधरी यांनी My Bharat पोर्टल वर युवकांची नोंदणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश इंगोले, शुभम ताकसांडे, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे यांनी परिश्रम घेतले.