Sunday, February 16, 2025
Homeटॉप स्टोरीबारावीच्या परीक्षांसाठी उद्या...

बारावीच्या परीक्षांसाठी उद्या राष्ट्रव्यापी बैठक!

बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने उद्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि इतर संबंधित व्यक्तींच्या एका उच्चस्तरीय आभासी बैठकीचे आयोजन केले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, केंद्रीय महिला आणि बालकल्याण स्मृती इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची सुरक्षितता आणि सुरक्षा विचारात घेऊन, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई, परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात पर्याय शोधत आहेत. परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचा उच्च शिक्षण संस्थांशी विचारविनिमय सुरू आहे, असे निशंक यांनी सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोविड-19 महामारीचा शिक्षण क्षेत्रासह विशेषत: बोर्डाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षेसह विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता, जवळपास सर्व राज्ये शिक्षण मंडळे, सीबीएसई आणि आयसीएसई यांनी 2021च्या इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आणि राष्ट्रीय परीक्षा घेणार्‍या अन्य संस्थांनीही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या प्रवेशपरीक्षा पुढे ढकलल्या आहेत, याकडेही या पत्रात लक्ष वेधले आहे.

बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याचा परिणाम राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा आणि देशभरातील इतर प्रवेशपरीक्षांवर होतो. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये असलेली अनिश्चितता दूर करण्यासाठी, देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध राज्य सरकारांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर इयत्ता बारावीच्या सीबीएसई परीक्षांविषयी निर्णय विचारात घेणे योग्य आहे, असे पोखरियाल यांनी म्हटले आहे.

पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतरांकडून यासंदर्भात माहितीही मागवली आहे.

Continue reading

स्कूटरवरून फिरणारे महाजन होणार का दिल्लीचे मुख्यमंत्री?

राजधानी दिल्ली तर भाजपाने जिंकली. परंतु तिथल्या मुख्यमंत्री निवडीचा विषय अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले प्रवेश वर्मा किंवा दिल्लीभर स्कूटरवरून फिरणारे आमदार जितेंद्र महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या...

स्टारफिश पाहा मुलुंडच्या देशमुख उद्यानात!

मुंबई महानगरपालिका, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ५ व ६ यांच्या विद्यमाने नागरिकांसाठी आज, १५ आणि उद्या १६ फेब्रुवारीला मुलुंड पूर्व येथील डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान येथे विनामूल्य पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्टारफिश, ऑक्टोपस...

‘देवमाणूस’चा टीझर झाला लाँच!

लव फिल्म्स निर्मित "देवमाणूस" सिनेमाचा टिझर नुकताच रिलीझ झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडकेसुद्धा आहेत. या नव्या आणि लव फिल्म्सच्या...
Skip to content