Homeएनसर्कलउद्या गुवाहटीत राष्ट्रीय...

उद्या गुवाहटीत राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारचे आयोजन!

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला 26 नोव्हेंबर 2023 रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय मैदान, गुवाहाटी, आसाम येथे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा् सरमा आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बाल्यान हेदेखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग राष्ट्रीय दुग्ध दिन- 2023 याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 याचे आयोजन करत आहे.

देशी जनावरांचे संगोपन करणारे शेतकरी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञ आणि दुग्ध सहकारी संस्था/दूध उत्पादक कंपनी/दुग्ध उत्पादक शेतकरी यांसारख्या सर्व व्यक्तींची ओळख करून घेणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे आहे यासाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांपैकी एक आहे.

देशी गायी/म्हशींच्या जातींचे पालन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक शेतकरी, सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी/दूध उत्पादक कंपनी/डेअरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT) या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

  • प्रथम क्रमांकासाठी 5 लाख रुपये,
  • द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख रुपये
  • तृतीय क्रमांकासाठी 2 लाख रुपये

सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मर आणि सर्वोत्कृष्ट DCS/FPO/MPCs या पहिल्या दोन श्रेणींमध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह तर सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT) श्रेणीच्या बाबतीत गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह यांचा समावेश असे या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 पुरस्कारांचे स्वरूप आहे.

योग्य प्रक्रियेनंतर, पशुसंवर्धन विभाग प्रत्येक श्रेणीतील विजेते घोषित करत आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे..

अनुक्रमांकश्रेणीएनजीआरए 2023 च्या विजेत्यांची श्रेणींसह नावे
1देशी वाणाच्या गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी1st – राम सिंग, कर्नाल, हरियाणा
2nd – निलेश मगनभाई अहिर, सुरत, गुजरात.
3rd – वृंदा सिद्धार्थ शाह, वलसाड, गुजरात
3rd – राहुल मनोहर खैरनार, नाशिक, महाराष्ट्र
2सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था/ दूध निर्मिती कंपनी/दूध उत्पादक शेतकरी संघटना1st – पुलपल्ली क्षीरोलपादक सहकारण संगम डी. मर्या., वायनाड, केरळ.
2nd -. टी.एम.होसूर दूध उत्पादक सहकारी संस्था मर्या., मांड्या, कर्नाटक.
3rd – एम.एस.158 नाथमकोविलपट्टी दूध उत्पादक सहकारी संस्था, दिंडीगुल, तामिळनाडू.
3Best Artificial Insemination Technician (AIT) सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी)1st – सुमन कुमार साह, अरारिया, बिहार.
2nd – अनिल कुमार प्रधान, अनुगुल, ओदिशा.
3rd – मुड्डपू प्रसादराव, श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश

सदर पुरस्कारांसाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने विकसित केलेल्या https://awards.gov.in या पोर्टलवर 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. या पोर्टलवर एकूण 1770 अर्ज सादर करण्यात आले.

कृषी आणि संबंधित क्षेत्रातील जीव्हीएच्या एक तृतीयांश भाग असलेले आणि 8% ची सीएजीआर म्हणजेच वार्षिक चक्रवाढ दर असलेले पशुधन क्षेत्र आज भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचवेळी, देशातील लाखो लोकांना स्वस्त आणि पौष्टिक अन्न पुरवण्यासोबतच पशुपालन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय हे उद्योग शेतकऱ्यांसाठी उत्पन्न देणारे स्त्रोत म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहेत, विशेषतः भूमिहीन, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आणि महिला यांच्यासाठी ते अत्यंत लाभदायक ठरले आहेत. भारतातील देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त आहेत आणि त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची जनुकीय क्षमता आहे.

देशी वाणांच्या पशुधनाचा विकास आणि संवर्धन यासाठी कोणताही विशिष्ट कार्यक्रम न राबवल्यामुळे सध्या या वाणांच्या पशूंची संख्या कमी होत चालली आहे आणि सध्या त्यांची उत्पादकता देखील त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी असल्याचे दिसते आहे. म्हणून देशातील पशुपालन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक विकास घडवून आणण्यासाठी केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील पशुपालन आणि दुग्धविकास विभागातर्फे राष्ट्रीय पशु प्रजनन आणि दुग्धविकास कार्यक्रमाअंतर्गत डिसेंबर 2014 मध्ये “राष्ट्रीय गोकुळ अभियान” सुरु करण्यात आले.

Continue reading

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...
Skip to content