Homeमुंबई स्पेशलशिक्षणाधिकारी राजेश कंकाळ...

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार

शैक्षणिक विषयात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना नुकतेच गौरविण्यात आले.

सन २०२२-२३करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (NIEPA-National Institute of Educational Planning and Administration), नवी दिल्ली या उच्चतम संस्थेद्वारा कंकाळ यांना गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथील भीम सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते व केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार, NIEPAचे कुलपती महेशचंद्र पंत, उपकुलपती शशिकला वंजारी, कार्यक्रम संचालक कुमार सुरेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कंकाळ

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ अशा विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत पालिकेच्या आठ माध्यमाच्या १२१४ शाळा व ११३४ बालवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये सुमारे १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. नवीन प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन मेरिट’ राबविण्यात येत आहे.

शिक्षण विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्राचे शिक्षक आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाचे परीक्षण करून राज्य स्तरावरून शिफारस करण्यात आली. यानंतर केंद्र शासनाच्या स्तरावर संगणकीय सादरीकरण व मुलाखत घेण्यात आली. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करत पालिकेच्या शिक्षण विभागाला शिक्षण क्षेत्रातील प्रशासन देखरेख करणाऱ्या अतिउच्च यंत्रणेकडून हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content