सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा कितीही सांगत असले की, नेत्यांनी साध्या गाड्यातून फिरावे; तरीही त्यांचेच नव्हे तर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपल्या बुडाखाली ‘एस यु व्ही’च हवी असते. मात्र, याच एस यु व्ही गाडयांसंबंधी एका दैनिकाने नुकताच भंडाफोड केला आहे. ते म्हणतात की भारतातील एस यु व्ही, या खऱ्या एस यु व्हीच नाहीत! बोंबला आता. राजकीय नेतेहो आणि त्यांचे साथीदार नोकरशहाहो.. आता शायनिंग कशी मारणार? 50 लाख ते 1 कोटी गेलेना पाण्यात… आणि आता त्यातच लोकसभेचा खर्च… अरे डोके फिरायची वेळ आली आहे… बघत काय बसता तोंडाकडे… गिऱ्हाईके आणा… दाणापाणी तरी सुटला पाहिजे ना भाऊ…
