सुप्रिया प्रॉडक्शन आणि व्हिजन व्हॉईस एन ॲक्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७व्या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेमध्ये रंगवेद, मुंबईच्या “उचल” या वर्हाडी बोलीतील एकांकिकेने अशोक सराफ व सुभाष सराफ पुरस्कृत प्रथम क्रमांकाचा नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार पटकावला.
दुसर्या क्रमांकाचा सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार नाट्यसेवा थिएटर्स, नाशिकच्या “अ डील” या घाटी बोलीतील एकांकिकेने तर तृतीय क्रमांकाचा नाट्यनिर्माते अनंत काणे पुरस्कार एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर यांच्या घाटी बोलीतील “पाटी” या एकांकिकेने मिळवला. स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान, सिंधुदूर्गच्या संगमेश्वरी बोलीतील “टोपरं” या एकांकिकेने लक्षवेधी एकांकिकेचा संगीतकार राजू पोतदार पुरस्कार प्राप्त केला.
नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट)च्या सहकार्याने या स्पर्धेची अंतिम फेरी श्री शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर प्रचंड उत्साहात पार पडली. यावर्षी या स्पर्धेत राज्यभरातून नाशिक, पुणे, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, इस्लामपूर, अमरावती, वसई, उस्मानाबाद येथून १४ बोलींतील १९ एकांकिकांनी सहभाग घेतला होता. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे भाचे प्रख्यात सनदी लेखापाल सुभाष सराफ यांच्या हस्ते सावकार यांच्या प्रतिमेला आणि ज्येष्ठ गायक अभिनेते अरविंद पिळगांवकर यांच्या हस्ते नटराजमूर्तीला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचा शुभारंभ झाला. परितोषिक वितरण ज्येष्ठ दिग्दर्शक व राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट)चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध मालिका लेखक व गीतकार विवेक आपटे, लेखक व अभिनेते अभिजीत पेडणेकर आणि लेखिका-दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेला अभिनेत्री सुप्रिया विनोद, ज्येष्ठ लेखक आभास आनंद, महेंद्र तेरेदेसाई, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते नारायण जाधव, प्रख्यात मालिका निर्माते खलील हेरेकर व नरेश बोर्डे, राजन बने, बोरीवली नाट्य परिषदेचे समीर तेंडुलकर, रमेश गायकवाड, अभिनेते सुदेश म्हशिलकर, दीपक कदम, प्रसिद्ध रंगभूषाकार संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते उलेश खंदारे, चित्रपट दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, निर्माते संदीप विचारे, ज्येष्ठ पत्रकार गोपीनाथ सावकार विश्वस्त निधीच्या शीतल करदेकर, लेखक विठ्ठल सावंत, प्रसिद्ध छायाचित्रकार संजय पेठे, केशव गोरे स्मारक ट्रस्टचे सुदेश सावंत, डॉ. अलका नाईक, लेखक-दिग्दर्शक कय्युम काझी, अभिनेते फजल शेख तसेच ज्येष्ठ नाट्यनिर्माते अनंत काणे यांचे चिरंजीव आदित्य काणे, स्नुषा अनया काणे, भाचे अनिल नाईक, भाची आशा दामले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुप्रिया चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास नार्वेकर आणि राजश्री पोतदार यांनी केले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:
सांघिक: प्रथम: नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कार- उचल (रंगवेद, मुंबई) (वर्हाडी)
द्वितीय: सुगंधा रामचंद्र कोंडेकर पुरस्कार- अ डील (नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक) (घाटी)
तृतीय: नाट्यनिर्माते अनंत काणे पुरस्कार- पाटी (एकदम कडक नाट्यसंस्था, भाईंदर) (घाटी)
लक्षवेधी: संगीतकार राजू पोतदार पुरस्कार- टोपरं (स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग) (संगमेश्वरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता:
प्रथम: विनय आपटे पुरस्कार- औदुंबर बाबर (पाटी) ;
द्वितीय: सतीश तारे पुरस्कार- विश्वंभर परेबार (अ डील)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:
प्रथम: आशालता वाबगावकर पुरस्कार- विजया गुंडप (पाटी) ;
द्वितीय: प्रियांका शाह पुरस्कार- पूजा पूरकर (अ डील)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता: कुलदीप पवार पुरस्कार- श्रवण रोकडे (टोपरं)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: याज्ञसेना देशपांडे पुरस्कार- हेमांगी आरेकर (पाटी)
सर्वोत्कृष्ट विनोदी लेखन: रमेश पवार पुरस्कार- ज्ञानेश्वर विधाते (सौभाग्यवती)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना:
प्रथम: राघू बंगेरा पुरस्कार- शीतल तळपदे (उचल) ;
द्वितीय: उमेश मुळीक पुरस्कार- कृतार्थ कंसारा (अ डील)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत:
अरुण कानविंदे पुरस्कार- प्रथम: प्रणय गायकवाड (पाटी)
द्वितीय: अक्षर गायकवाड – संजय उंबरकर (उचल)
सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन: गोविंद चव्हाण पुरस्कार- टोपरं (स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग)
सर्वोत्कृष्ट लेखक: गंगाराम गवाणकर पुरस्कृत – प्रथम: आनंद जाधव (अ डील)
द्वितीय: भावेश आंबडस्कर (पाटी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: चेतन दातार पुरस्कार- प्रथम: डॉ. श्वेता पेंडसे (उचल)
द्वितीय: आनंद जाधव (अ डील)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य:
प्रथम: सखाराम भावे पुरस्कार- आर्यन जाधव (अ डील) ;
द्वितीय: रघुवीर तळाशीलकर पुरस्कार- सुयश नांदगांवकर – श्रवण रोकडे (टोपरं)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा:
प्रथम: सनईवादक सीताराम जिव्या सावर्डेकर पुरस्कार- मनाली कांबळे (टोपरं) ;
द्वितीय: रंगनाथ वामन कुलकर्णी पुरस्कार – डॉ. श्वेता पेंडसे (उचल)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा:
प्रथम: रंगमहर्षी कृष्णा बोरकर पुरस्कार- आनंद गायकर, मनाली चुडनाईक-जोगळे (बाप नक्की जगता तरी कसो)
द्वितीय: अभिषेक शरद सावंत पुरस्कार – शरद सावंत (टोपरं)
सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय: डॉ. उत्कर्षा बिर्जे पुरस्कार- अंजली दिब्रिटो (गोदा)
प्राथमिक फेरीतील अभिनय सन्मानपत्र:
१) श्रावणी आयरे (आई) विहीर- उगवाई कलारंग, बोरिवली
२) मनस्वी लगाडे (विद्या) एकूण पट १- विथी, वझे रंगकर्मी, मुलुंड
३) धम्ममेघा महावीर कांबळे (बायको – शोभा) चाबूक- नाट्यरंग, इस्लामपूर
४) बद्रीश कट्टी (मुलगा) चाहूल- कलाकार मंडळी, पुणे
५) श्रावणी खानविलकर (आई) यात्रा- जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे
६) आरोही खेंगले (कल्याणी) साद- आर. डी. क्रिएशन, मुंबई
७) निलेश अशोकराव (संग्राम) हुर्रर्रर्रर्र.. झाली की नाय खोचके- नाट्यदिंडी प्रतिष्ठान, ठाणे
८) केशव जगताप (विऱ्या) चाबूक- नाट्यरंग, इस्लामपूर
९) समीर विरुटकर (अभिनव) शेवट तितका गंभीर नाही- विद्यार्थी विकास विभाग, डॉ. बाआंम विद्यापीठ, धाराशीव
१०) संचिता जोशी (आजी) चाहूल- कलाकार मंडळी, पुणे
स्पर्धेची अंतिम फेरी दरवर्षी गोपीनाथ सावकार यांच्या जन्मदिनी!
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आता दर वर्षी १२ किंवा १४ जानेवारी रोजी होणार असल्याचे सुप्रिया प्रॉडक्शनच्या निर्मात्या सुप्रिया गोविंद चव्हाण आणि व्हिजन व्हॉईस एन अॅक्टचे श्रीनिवास नार्वेकर यांनी जाहीर केले आहे. १२ जानेवारी हा नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचा जन्मदिन तर १४ जानेवारी हा त्यांचा स्मरणदिन आहे.
२०२५ची प्राथमिक फेरी ३ ते ५ जानेवारी रोजी!
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या म्हणजे २०२५च्या प्राथमिक फेरीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून ही प्राथमिक फेरी शुक्रवार ३ ते रविवार ५ जानेवारी २०२५ या कालावधीत होईल.
स्पर्धकांच्या सोयीसाठी राज्यातील एकांकिका स्पर्धा आयोजकांचे एकत्रित संमेलन
स्पर्धकांना अधिकाधिक स्पर्धा करणे सोयीचे व्हावे आणि कोणत्याही आयोजक संस्थेचे वेळापत्रक बिघडू नये, यासाठी सुप्रिया प्रॉडक्शन आणि व्हिजन व्हॉईस एन अॅक्टच्या वतीने राज्यातील एकांकिका स्पर्धा आयोजकांचे एक संमेलन लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे श्रीनिवास नार्वेकर यांनी यावेळी जाहीर केले. स्पर्धक संघ आणि आयोजक संस्था सर्वांनाच आपापल्या स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करणे सोपे होईल आणि सारख्याच तारखांना अनेक स्पर्धा करण्याची कसरत करावी लागणार नाही, या दृष्टीने या संमेलनात काही आखणी केली जावी, असा उद्देश असून या संमेलनाला राज्यभरातील एकांकिका स्पर्धा आयोजक संस्था सहकार्य करतील, अशी अपेक्षा श्रीनिवास नार्वेकर यांनी व्यक्त केली.