Homeचिट चॅटमुंबई विद्यापीठाची येत्या...

मुंबई विद्यापीठाची येत्या शनिवार-रविवारी कार्यशाळा

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने  येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि  रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा ‘प्रमाण मराठी लेखन’ आणि ‘आवाज’ या दोन विषयांवर या कार्यशाळा अत्यल्प शुल्कात उपलब्ध होणार आहेत.

या क्षेत्रातील तज्ज्ञ वैभव चाळके (ज्येष्ठ पत्रकार) आणि उमेश घळसासी (नाट्य-चित्रपट-पत्रकारिता व्याख्याता) हे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा  पूर्ण झाल्यानंतर सहभागींना,  गरवारे संस्थेकडून इ-प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५००/- रुपये असेल तर दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे ७५०/- रुपये शुल्क देऊन दोन्ही कार्यशाळांमध्ये भाग घेता येईल.

नावनोंदणीसाठी संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी 9987395457 किंवा 85915 90174 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या समन्वयक नम्रता कडू यांनी केले आहे.

Continue reading

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...
Skip to content