Homeकल्चर +"मुगले आझम" ठरला...

“मुगले आझम” ठरला राज्यपालांचा पहिला व अखेरचा चित्रपट!

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दिलीप कुमार भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. दिलीप कुमार यांचा मुगले आझम मला इतका आवडला की, मी लगोलग दोन वेळा हा चित्रपट पहिला. परंतु, त्यानंतर चित्रपट पाहणे झाले नाही आणि मुगले आझम, मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला, अशा भावनाही राज्यपालांनी यानिमित्ताने व्यक्त केल्या.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत दिलीप कुमार यांच्यासह चित्रसृष्टीतले अनेक दिग्गज. राजभवनात घेतलेले हे एक दुर्मिळ छायाचित्र..

भारतीय चित्रपट सृष्टी आज जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या यशाचे शिल्पकार जसे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार व गायक आहेत, तसेच दिलीप कुमार यांच्यासारखे सशक्त अभिनेते होते. दिलीप कुमार हे एक दंतकथा झाले होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. माझ्याकरिता ते महानायक होते. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या पत्नी सायरा बानो व त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content