Homeडेली पल्सखासदार राजेंद्र गावित...

खासदार राजेंद्र गावित यांची भाजपात घरवापसी

पालघरचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये घरवापसी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

खा.गावित यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमदार, खासदार आणि आदिवासी विकास मंत्री असा राजकारणातील मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या राजेंद्र गावित यांचा एका अर्थी भाजपामध्ये पुनर्प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच गावित यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. खा. गावित यांच्या अनुभवाचा फायदा दिल्लीपेक्षा राज्यात अधिक होणार आहे. यादृष्टीने त्यांच्या संमतीनेच पालघरमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे. खा. गावित यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान राखला जाईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. फडणवीस राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. यापुढे भाजपा नेतृत्त्व जी जबाबदारी सोपवेल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन, असे खा. गावित यांनी यावेळी सांगितले.

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content