Monday, December 23, 2024
Homeन्यूज ॲट अ ग्लांसनसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये...

नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मातम!

इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात हिजबुल्लाह, या कथित दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरल्लाह याचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभर जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी आणि फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी मातम केला. हातात नसरल्लाहचे फोटो घेऊन या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर इस्त्रायलच्या विरोधात निदर्शने केली. प्रचंड घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

इस्त्रायलने काल लेबननमधल्या हिजबुल्लाहच्या मुख्यालयाच्या बंकरमध्ये 50 फूट खाली लपलेल्या नसरल्लाहवर दोन सेकंदात नऊ बॉम्बचा वर्षाव केला. हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हा हल्ला झाला त्यावेळेला नसरल्लाहबरोबर त्याचे जवळजवळ दोन डझन कमांडर होते. इस्त्रायलने सुरुवातीला क्षेपणास्त्राने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी बंकर उद्ध्वस्त करणाऱ्या बॉम्बचा वर्षाव केला. त्यात अवघ्या 11 सेकंदामध्ये मुख्यालयाची पूर्ण इमारत नष्ट झाली. त्यानंतर नसरल्लाह मारला गेल्याची घोषणा इस्त्रायलने केली. काही तासांनंतर हिजबुल्लाहनेही नसरल्लाह मारला गेल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.

नसरल्मलाहवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तो जमिनीच्या खाली पन्नास फूट असलेल्या बंकरमध्ये होता. त्यावर 80 टन विस्फोटक टाकले गेले. ऑपरेशन न्यू ऑर्डर याखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी टाकण्यात आलेल्या बॉम्बची क्षमता सहा फूट जाडीच्या काँक्रिटचा स्लॅबही भेदण्याची होती. हे बॉम्ब लेझरगायडेड होते. या हल्ल्यात नसरल्लाहची मुलगीही मारली गेल्याचे कळते.

हे वृत्त पसरताच जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांनी आपल्या निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे स्थगित केला आणि नसरल्लाहच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मोर्चे काढत इस्रायलचा निषेध केला. नसरल्लाहच्या हत्त्येनिमित्त भारताने तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळावा अशी मागणीही आंदोलकांपैकी काहींनी केली. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज मेहबुबा यांच्याबरोबर फारूख अब्दुल्ला यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही उभे ठाकले. त्यांनीही नसरल्लाहच्या हत्त्येचा निषेध केला. दरम्यान, हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहचा मृतदेह बंकरच्या बाहेर काढला. त्यावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यावरून नसरल्लाहचा मृत्यू बॉम्बच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content