Homeब्लॅक अँड व्हाईटमाजी सैनिकांच्या नोकऱ्यांसाठी...

माजी सैनिकांच्या नोकऱ्यांसाठी खाजगी क्षेत्रासोबत सामंजस्य करार!

संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर) आणि मेसर्स जेनपॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. डीजीआर आणि कॉर्पोरेट्स यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे संरक्षण सेवांमधील माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि माजी सैनिकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जातो.

व्यावसायिक सेवांमध्ये जगात आघाडीवर असलेली जेनपॅक्ट माजी सैनिकांसाठी अर्थपूर्ण करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल. महासंचालक (पुनर्वसन) मेजर जनरल शरद कपूर म्हणाले, या भागीदारीमुळे आपल्या माजी सैनिकांना उद्योग आणि कॉर्पोरेट्समध्ये अधिक वाव मिळेल आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल तसेच आपल्या माजी सैनिकांना दुसरी सन्मानजनक कारकीर्द सुरु करण्याची संधी मिळेल.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content