Homeएनसर्कलरणजित सावरकरांच्या मातोश्री...

रणजित सावरकरांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री आणि हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष, प्रज्वलंत मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे आज, मंगळवारी २१ मार्च २०२३ रोजी पुणे येथे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र पृथ्वीराज सावरकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले तर त्यांचे कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष असून मुरबाड येथे ते राहतात.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात, स्वामिनी सावरकर त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत पृथ्वीराज यांच्या कुटुंबासह पुण्यात राहत होत्या. पती विक्रम सावरकर यांच्यासोबत त्यांनी प्रज्वलंत नावाच्या वृत्तपत्राचे कामही सांभाळले. यासोबतच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही त्यांनी पाहिले. तेथे त्या कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर यांच्यासोबत राहत होत्या. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्वामिनी विक्रम सावरकर यांचा जन्म नागपूरच्या गोखले यांच्या कुटुंबात १८ डिसेंबर १९३९ या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग गोखले असे होते. आईचे नाव मनोरमा गोखले असे होते. विवाहापूर्वीचे त्यांचे नाव मंदाकिनी गोखले होते. त्यांना दोन बहिणी आणि एक बंधू होते. त्यांचा विवाह ११ मे १९५८ या दिवशी विक्रम सावरकर यांच्याशी झाल्यानंतर  सावरकर कुटुंबात स्वामिनी म्हणून त्यांचे आगमन झाले. तेव्हापासून सामाजिक कार्य, संपादनकार्य यासह विविध क्षेत्रात त्या स्वामिनी विक्रम सावरकर म्हणून ओळखल्या जात.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content