Homeन्यूज ॲट अ ग्लांसमान्सून जायचे नाव...

मान्सून जायचे नाव घेईना!, महाराष्ट्राला तडाखा!! राजस्थानातही परतीनंतर दणका!!!

यंदा मान्सून काही केल्या देशातून जायचे नाव घेताना दिसत नाही. भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थानातून मान्सून संपूर्ण माघारी गेल्याची घोषणा केली होती. मात्र, आता परतीनंतर राजस्थानात मान्सून पुन्हा दणका देणार आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रासह केरळ, ओदिशा आणि ईशान्य भारतालाही मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा “आयएमडी”चा अंदाज आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे सुरू राहतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडील कमी दाबाचा पट्टा आज पहाटे दक्षिण ओदिशाचा किनारा ओलांडून दक्षिण किनारपट्टीवर केंद्रित झाला आहे. ही प्रणाली ताशी 12 किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे दक्षिण ओदिशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. पुढील 24 तासांत छत्तीसगडकडे जाताना ते कमकुवत होत जाईल. या काळात देशभरातील अनेक राज्यात दुर्गापूजा, नवरात्र, गरबा-दांडिया उत्सवादरम्यान हलका-मध्यम तर काही भागात मुसळधार-अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दुसरीकडे, उत्तरेतील अनेक राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर उकाडा वाढत असून अनेक शहरात तापमान 30 अंशापार पोहोचले आहे.

मुंबई-ठाणे, कोकणासाठी इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ठाणे, मुंबईसाठी 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगडसाठी 28 सप्टेंबरला रेड अलर्ट असून 27 आणि 29 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर रेड अलर्टमध्ये बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंध्र-तेलंगणात धुंवाधार

या मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस असलेली आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील टॉप 5 शहरे-

आंध्र प्रदेश- नंदीगामा- 822 मिमी, अमरावती- 779 मिमी, विशाखापट्टणम- 747 मिमी, कलिंगपट्टणम- 740 मिमी, बापटला- 720 मिमी.

तेलंगणा- मेदक- 1,604 मिमी, आदिलाबाद- 1,436 मिमी, हकिमपेट- 973 मिमी, खम्मम-940 मिमी, बदराचलम- 915 मिमी.

कोयनेतून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणात सध्या 104.12 TMC पाणीसाठा झाला आहे. धरण 100% भरल्याने सध्या 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असून कोयना आणि कृष्णाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पूरनियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज सकाळी दहा वाजल्यापासून 90,000 क्यूसेक्सएव्हढा करण्यात आलेला आहे. या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.

Continue reading

22 वर्षांनंतर प्रथमच! तुम्ही बदलू शकता ‘जीमेल’ आयडी!!

जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा असलेल्या 'जीमेल'मध्ये तब्बल 22 वर्षांनंतर मोठा बदल करण्यात आला आहे. 'गुगल'ने आता वापरकर्त्यांना त्यांच्या ईमेल पत्त्यात (युझरनेम) बदल करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांसाठी “नवीन ईमेल अ‍ॅड्रेस” घेण्याची गरज किंवा संधी निर्माण झाली आहे. काय...

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आता ३०व्या वर्षीच करा तपासणी!

हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे. 'अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी' (एसीसी) आणि 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' (एएचए) या जागतिक स्तरावरील नामवंत संस्थांनी '२०२६ कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट गाईडलाईन्स' नुकत्याच जाहीर केल्या आहेत. या नवीन नियमावलीमुळे हृदयविकाराचा धोका...

हे आहे इंटरनेटवरच्या ‘४०४ एरर’मागचे गुपित!

आज '४०४ डे'. इंटरनेटवर एखादी लिंक उघडल्यावर जेव्हा स्क्रीनवर '४०४ एरर: पेज नॉट फाऊंड' असा तांत्रिक संदेश दिसतो, तेव्हा तो केवळ तुटलेल्या लिंकचा संकेत नसतो. डिजिटल हक्कांच्या परिभाषेत, ४०४ हा कोड आता 'डिजिटल मौना'चे आणि माहिती लपवण्याच्या प्रवृत्तीचे प्रतीक...
Skip to content