Homeपब्लिक फिगरमोदींनी आणला आपत्ती...

मोदींनी आणला आपत्ती काळात टिकणारा व्यवस्थापन आराखडा

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. 

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहितीपर संदेशांची मालिका लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला. या आराखड्याअंतर्गत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना केली, तसेच आपत्तींविषयी सतर्कतने पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित केली. यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना  शून्य मृत्य असा दृष्टिकोन अवलंबला. सद्यस्तितीतली आपली आपत्ती प्रतिसाद पथके प्रत्येक व्यक्तीचा जीव सुरक्षित करण्याच्या ध्येयाने प्रेरित आहेत, आणि ते पूर्णतः एक पेशेवर दल या दृष्टीकोनातूनच कार्यरत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने, आपत्कालीन परिस्थितींचा सामना करताना  शून्य मृत्य असा दृष्टिकोन अवलंबल्याने बिपरजॉय चक्रीवादळाची विध्वंसक ताकदही आपल्या नागरिकांपैकी कोणाचाही जीव हिरावून घेऊ शकली नाही असे ते म्हणाले.

गृह मंत्रालयाने 8000 कोटी रुपयांची आपत्ती व्यवस्थापन योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्याराज्यांमध्ये अग्निशमन सेवेचा विस्तार करण्यात आला. यामुळे सात प्रमुख शहरांमध्ये पुरापासून होणाऱ्या नुकसानीचा आणि 17 राज्यांमध्ये भूस्खलनामुळे होणाऱ्या नुकसानीचा धोका कमी झाला आहे. यासोबतच अग्निशमन सेवेचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी जून 2023मध्ये पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

वर्ष 2021मध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत ‘राज्य आपत्ती निवारण निधी’ अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासाठी 13,693 कोटी रुपये, तर राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी 32,031 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती शाह यांनी दिली. 2005-2014च्या तुलनेत 2014-2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासासाठीचा निधी तिप्पटीने वावढला असल्याची बाबही त्यांनी आपल्या संदेशात नमूद केली आहे. 

350 आपत्तीप्रवण जिल्ह्यांमध्ये 369 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या आपदा मित्र योजनेचा उद्देश 1,00,000 युवा स्वयंसेवकांना प्रशिक्षित करणे, हा आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 83,000पेक्षा जास्त युवा स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले असून, आपत्तींना सामोरे जाण्याच्या जोखमीच्या अनुषंगाने या स्वयंसेवकांच्या जीवन विम्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अमित शाह यांनी आपल्या संदेशातून दिली आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content