Homeबॅक पेजघोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये एमआयजी आणि डॅशिंग अंतिम फेरीत

एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना हे यश मिळवून देण्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्रीची आक्रमक फलंदाजी कारणीभूत ठरली. तिने ५९ चेंडूत १० चौकार मारत नाबाद ७४ धावा फटकावल्या. त्यामुळे तिच्या संघाला साईनाथची ४ बाद १२६ ही तशी माफक धावसंख्या १९ षटकांमध्ये पार करता आली. त्यांची गाठ आता डॅशिंग स्पोर्ट्सशी उद्या बुधवारी माटुंगा जिमखान्यावर होईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग युनियनने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमसह आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये नॅशनल क्रिकेट क्लबचा ८ विकेट्सनी पराभव करून डॅशिंग स्पोर्ट्सने एमआयजीशी लढण्यासाठी आपली सिद्धता केली. नॅशनलला २० षटकांत केवळ ९ बाद ८६ अशी मजल मारता आली. त्यांची ध्रुवी त्रिवेदी ही १८ धावांची सर्वोच्च खेळी करू शकली. निलाक्षी तलाठी आणि श्रेया सुरेश यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. डॅशिंगने १५ षटकांमध्ये आपले लक्ष्य पार केले. २ बाद १८ नंतर खुशी निजाई (नाबाद २७) आणि किमया राणेने (नाबाद ३२) ६९ धावांची अभेद्य भागिदारी केली.

आजच्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये साईनाथने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो तसा चुकीचा ठरला. सलामीची अंशू पाल आणि या स्पर्धेत एका शतकासह दोन अर्धशतके फटकावणारी किंजल कुमारी केवळ ४ धावांवर बाद झाल्याने त्यांची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्यानंतर शेजल विश्वकर्मा (५७ चेंडूत ५७ आणि वेदिका पाटील ५३ चेंडूत ५२) यांनी ११५ धावांची भागीदारी केली खरी, पण त्यामुळे एमआयजीसमोर फार मोठे लक्ष्य साईनाथला ठेवता आले नाही. महेक मिस्त्रीने आपल्या ऑफ स्पिनवर ४ षटके टाकत स्वत:ची उपयुक्ततापण सिद्ध केली.

संक्षिप्त धावफलक

साईनाथ स्पोर्ट्स क्लब-  २० षटकांमध्ये ४ बाद १२६ (सेजल विश्वकर्मा ५७, वेदिका राजेश पाटील ५२)

पराभूत वि.

एमआयजी क्रिकेट क्लब- १९ षटकात ४ बाद १२७ (महेक मिस्त्री नाबाद ७४)

सर्वोत्तम खेळाडू- महेक मिस्त्री

नॅशनल क्रिकेट क्लब- २० षटकांमध्ये ९ बाद ८६ (ध्रुवी त्रिवेदी १८, पूर्ती नाईक २८/२, निलाक्षी तलाठी १०/२, श्रेया सुरेश ८/२, तिशा नाईक २५/२)

पराभूत वि.

डॅशिंग स्पोर्ट्स- १५ षटकांत २ बाद ८७ (किमया राणे ३२ नाबाद, खुशी निजाई २७ नाबाद, तनिषा शर्मा १०/२)

सर्वोत्तम खेळाडू- निलाक्षी तलाठी

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content