Homeटॉप स्टोरीदिवाळीच्या सुट्टीतला घोळ,...

दिवाळीच्या सुट्टीतला घोळ, विद्यार्थी संभ्रमात!

राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगेवगळे कालावधी जाहीर झाले असून त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र गोंधळात पडले आहेत.

दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर,पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सुट्टीची सूचना देण्यात आली आहे. या सुट्टीमुळेच ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत.

मात्र, आज राजेंद्र पवार, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीने काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मूळगावी जाण्यासाठी केलेले नियोजनही बिघडणार आहे.

शिक्षकांच्या शिक्षक भारती, संघटनेने शिक्षण विभागाच्या गचाळ कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पत्राद्वारे दिवाळी सुट्टीचा कालावधी ऐनवेळी न बदलता पूर्ववत ठेवावा, अशी मागणी केली आहे. शिक्षण विभागातील अधिकारी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा सुट्टीचा कालावधी जाहीर करतात आणि ऐनवेळी मंत्रालयातून सुट्टी कालावधीत बदल केला जातो. हा काय प्रकार आहे? या प्रकरणाने पुन्हा एकदा शिक्षण विभागातील सावळागोंधळ समोर आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केल्यानुसार राज्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मूळगावी/परगावी जाण्याचे आरक्षण केले आहे. ऐनवेळी सुट्टी कालावधीत बदल केल्यास सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागेल. शिक्षक भारती संघटनेने दिवाळीची सुट्टी पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content