गीतकार मेघना साने रचित आणि ऑस्ट्रेलियातील संगीतकार किरण प्रधान यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी आरएनबी साँगचे रेकॉर्डिंग सुप्रसिद्ध गायिका अबोली गिऱ्हे हिच्या सुमधुर आवाजात, अमर मोहिले यांच्या अंधेरीच्या स्टुडिओत करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशन दादर येथील मुंबई बिट्स स्टुडिओमध्ये करण्यात आले. यावेळी चित्रपट निर्माते अर्जुन मुद्दा, प्रसिद्ध उद्योजक मोहन गोरे उपस्थित होते.

‘सांग तू ओढ ही लागतसे मज कशी’ असे या गाण्याचे शब्द आहेत. या गीतावर म्युझिटेक क्रिएशन यांच्याकडून व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून त्यात स्वतः अबोलीने नायिकेची भूमिका साकारली आहे. नायकाची भूमिका ठाणे येथील कलाकार हार्दिक सबनीस यांनी केली आहे. स्क्रीन प्ले आणि दिग्दर्शन मेघना साने यांचे आहे तर ओमकार आणि मानसी सूर्यवंशी यांनी चित्रिकऱण आणि एडिटिंग केले आहे. या कार्यक्रमास सर्व कलाकार उपस्थित होते. तर संगीतकार आणि या व्हिडिओचे निर्माते किरण प्रधान हे ऑनलाईन उपस्थित होते.

