Homeकल्चर +श्याम तारेंच्या ‘मेघ...

श्याम तारेंच्या ‘मेघ दंव’ या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन

श्याम तारे हे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले असले तरी त्यांचा खास ठसा हा स्तंभलेखकाचा आहे. अनेक नियतकालिकांमध्ये आजही ते लिहित आहेत. कवितेसारख्या नाजूक आणि संवेदनशील प्रकारातही त्यांची लेखणी लीलया संचार करते. ईश्वरविषयक चिंतन आणि प्रेमभावनेचे विविध पापुद्रे त्यांची प्रतिभा सहज शब्दांकित करते. त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. ती प्राय: नादानुसारी असते आणि संगीत हा तिचा अंगभूत गुणधर्म असतो, असे उद्गार प्रसिद्ध मराठी लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी काढले.

वयाच्या ८२व्या वर्षात पदार्पण केलेल्या श्याम तारे यांच्या ‘मेघ दंव’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथे संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या संग्रहाची एक खास बात अशी की, या संग्रहाला नागपूरचे मान्यवर समीक्षक आणि मराठीचे विभागप्रमुख डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना लाभली आहे.

संग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ. राजेंद्र नाईकवाडे म्हणतात की, सुरेश भट यांच्यासारख्या मराठी गझल सम्राटाच्या सहवासात मोठा उमेदीचा काळ घालविलेल्या या कवीची मूळ वृत्ती गझलानुकूल आहे आणि सोबतच गझलच्या ‘वृत्तां’वरही त्यांचे असाधारण प्रभुत्व आहे. हा काव्यप्रकार ते अतिशय कुशलतेने आणि सहजतेने हाताळताना दिसतात.

‘भेटीचा क्षण गहिरा कातर स्वर झाला

नयनांच्या ओंजळीत हळवा मृग आला..’

अशा ओळी ते लिहून जातात.

डिंपल पब्लिकेशन यांनी हा संग्रह प्रकाशित केला असून मुखपृष्ठ सतीश भावसार यांचे आहे. पुन्हा एकदा डॉ. अनंत देशमुख यांच्या शब्दात सांगायचे तर कवी एक निवेदक म्हणून अनुभव सांगतोय. त्यात अकारण भावविवशता किंवा उरबडवेपणा नाही आणि म्हणूनच श्याम तारे यांची कविता आपल्याला अधिकच भावते… अस्वस्थ करते.

मेघ दंव- लेखक श्याम तारे

प्रकाशक- डिंपल पब्लिकेशन

किंमत- रु. २००/-

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content