Homeन्यूज अँड व्ह्यूजकर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या...

कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या कट्टरतावाद्यांचा संघर्ष म्हणजे ‘मीरबीन’!

दिग्दर्शक मृदुल गुप्ता, लेखक मणिमाला दास आणि कर्बी फीचर फिल्म मीरबीनचे निर्माते धनीराम टिसो यांनी काल गोव्यात 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमांशी काहीही आडपडदा न ठेवता संवाद साधला. कर्बी आंगलाँगला ग्रासलेल्या कट्टरतावाद्यांच्या संघर्षाचे, मीरबीन हा चित्रपट म्हणजे अस्सल चित्रण आहे. आमचा हा चित्रपट सत्य आणि वस्तुस्थितीची कथा आहे, असे दिग्दर्शक मृदुल गुप्ता यांनी सांगितले.

लोक आपल्या मुळांवर आघात होत असूनही संकटाशी टक्कर देणाऱ्या लवचिकतेचे प्रदर्शन करत पुन्हा उठून उभे राहत आहेत हे प्रसंग जिवंत करण्यासाठी, संपूर्ण चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये झाडाची मुळे कथेला एक मजबूत प्रतीकात्मक कमान देत वापरली आहे, असे चित्रपटात वापरलेल्या मुळांच्या प्रतिकाबद्दल बोलताना लेखिका मणिमाला दास यांनी सांगितले.  

मणिमाला दास पुढे म्हणाल्या की, चित्रपटातील संगीत खऱ्या अर्थाने केवळ पारंपरिक कार्बी धून वापरून केलेले अस्सल संगीत आहे. आम्हाला आशा आहे की प्रेक्षक आमच्या चित्रपटाद्वारे कार्बींबद्दल सहानुभूती दाखवतील आणि कार्बीचा संघर्ष अनुभवतील, असे लेखिका मणिमाला यांनी सांगितले.

मणिमाला दास यांनी चित्रपटातील हातमागाच्या महत्वाबद्दल सांगितले. आसाममधील संघर्षात अडकलेल्या लोकांसाठी वस्त्रोद्योग हा पुनर्प्राप्तीचा आणि मुक्तीचा मार्ग ठरला. मीरबीन सुद्धा तिच्या बालपणीच्या सर्दीहुन, या कर्बी आदिवासी रिवाजातील, वस्त्रांच्या मायावी देवीच्या कथांमधून प्रेरणा घेते. नव्या आशा आणि उद्दिष्टांसह ती संकटातून यशस्वीपणे बाहेर पडते. 

या चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना निर्माते धनोराम टिसो म्हणाले, चित्रपट निर्माता म्हणून जनजागृती करणे, लोक संकटातून कसे सावरले आणि अंध:कारमय भूतकाळाच्या छायेतून बाहेर पडून कसे नव्याने बहरले याची कथा सांगणे हे माझे कर्तव्य आहे.

वेगवान आणि चैतन्यपूर्ण आसामी चित्रपटाचे प्रतिनिधित्व करणारा मीरबीन, ईफ्फी 54 मध्ये प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक (सुवर्ण मयूर) पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या 15 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे आणि महोत्सवात भारतीय चित्रपट विभागात तो दाखवण्यात आला. 

मीरबीन ही आशा आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या प्रवृत्तीची आकर्षक कथा आहे. ही कथा, तिची मध्यवर्ती नायिका मीरबीन अथक संकटांना तोंड देत आपल्या स्वप्नांना कशी घट्ट धरुन ठेवते याबाबतचा जीवनप्रवास उलगडते. तिच्या संघर्षात, ती कार्बी लोकांच्या वेदना आणि त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे मूर्तीमंत प्रतिक बनते. 

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content