Homeचिट चॅटअडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय...

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात एमडीसीच्या सार्थक केरकरने राष्ट्रीय ख्यातीची शालेय कॅरमपटू तनया दळवीला २५-० असा नील गेम देऊन एमडीसीने १-० असा दमदार प्रारंभ केला. प्रत्युत्तरादाखल जैतापूरच्या आर्यन राऊतने वेदिका पोमेंडकरला २५-० असा नील गेम देत सुरेश आचरेकर फिनिशर्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. निर्णायक सामन्यात उदयोन्मुख शालेय कॅरमपटू अमेय जंगमने अर्णव गावडेला १७-११ असे चकविले.

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित मुंबईतल्या दादर-पश्चिम येथील शालेय सुपर लीग मोफत कॅरम स्पर्धेची सिबिईयु वॉरीयर्स विरुध्द आत्माराम मोरे प्रतिष्ठान यामधील तृतीय क्रमांक लढतदेखील चुरशीची झाली. प्रतिष्ठानच्या मयुरेश पवारने श्रेया पवारला तर सिबिईयुच्या प्रसाद मानेने प्रेक्षा जैनला नील गेम देत सामना बरोबरीत राखला. अखेरच्या तिसऱ्या सामन्यात श्रीशान पालवणकरने उमैर पठाणचा २५-५ असा पराभव करून आत्माराम मोरे प्रतिष्ठानने तिसऱ्या स्थानावर २-१ अशी बाजी मारली. स्पर्धेतील उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचे मानकरी गोविंदराव मोहिते फायटर्स, आनंदराव अडसूळ प्लॅटीनम, अभिजित घोष फेअर प्ले, अविनाश नलावडे स्पोर्ट्स आदी संघ ठरले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, क्रीडापटू राजीव अडसूळ, विष्णू तांडेल, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण तसेच युनियनचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पंचाचे कामकाज संतोष जाधव, सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, अविनाश महाडिक, अर्जुन कालेकर, वेदांत महाडिक, ओमकार चव्हाण, प्रॉमिस सैतवडेकर‌ यांनी केले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content