Homeडेली पल्स2.64 लाख प्राथमिक...

2.64 लाख प्राथमिक सहकारी संस्थांचे झाले मॅपिंग!

सहकार मंत्रालय टप्प्याटप्प्याने सर्वसमावेशक राष्ट्रीय सहकारक्षेत्र आकडेवारी आणि माहिती विकसित करत आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय या तीन क्षेत्रातील सुमारे 2.64 लाख प्राथमिक सहकारी संस्थांचे मॅपिंग टप्पा-I अंतर्गत फेब्रुवारी, 2023 मध्ये पूर्ण झाले आहे. टप्पा-II अंतर्गत, राष्ट्रीय सहकारी संस्था/संघांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. टप्पा-III अंतर्गत, इतर सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या उर्वरित सहकारी संस्थांपर्यंत माहितीचा विस्तारित केला जात आहे. टप्पा-III अंतर्गत माहिती संकलन पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय सहकारी माहितीसाठा (डेटाबेस) जारी केला जाईल. सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघटने (NCUI) द्वारे प्रकाशित भारतीय सहकारी चळवळ-2018 च्या सांख्यिकी अहवालानुसार, देशातील राज्यवार सहकारी संस्थांची माहिती पुढील परिशिष्टात आहे.

Sr. No.Name of State/UTNumber of cooperative societies
1ANDAMAN AND NICOBAR ISLANDS2104
2ANDHRA PRADESH73218
3ARUNACHAL PRADESH783
4ASSAM10246
5BIHAR39169
6CHANDIGARH243
7CHHATTISGARH11364
8DELHI6360
9GOA3822
10GUJARAT77550
11HARYANA24572
12HIMACHAL PRADESH5394
13JAMMU AND KASHMIR#2020
14JHARKHAND13855
15KARNATAKA40938
16KERALA19263
17LAKSHADWEEP81
18MADHYA PRADESH47415
19MAHARASHTRA205886
20MANIPUR9237
21MEGHALAYA1555
22MIZORAM1437
23NAGALAND9059
24ODISHA17330
25PUDUCHERRY532
26PUNJAB17437
27RAJASTHAN28459
28SIKKIM5464
29TAMIL NADU24482
30TELANGANA65156
31THE DADRA & NAGAR HAVELI AND DAMAN & DIU390
32TRIPURA2067
33UTTAR PRADESH48188
34UTTARAKHAND5623
35WEST BENGAL33656
Total854355
स्रोत: NCUI द्वारे प्रकाशित भारतीय सहकारी चळवळ-2018 चा सांख्यिकी अहवाल # जम्मू आणि काश्मीरच्या (UT)  आकडेवारीमध्ये लडाखच्या (UT) आकडेवारीचा समावेश आहे.


 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content