Homeटॉप स्टोरीमनोज लोहिया छत्रपती...

मनोज लोहिया छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त!

मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे यांना पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे तर पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री राज्य पोलीस दलाच्या गृह विभागाने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या. मुंबईच्या मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ए. डी. कुंभारे यांना राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.  नवी मुंबईच्या गुन्हा शाखेचे अपर पोलीस आयुक्त एम. आर. घुर्ये यांची पुण्याच्या राज्य राखीव पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचेच पोलीस सहआयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईतील गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी. एस. चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डी. आर. सावंत यांची महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त आर. बी. डहाळे यांची पुण्याच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमीचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे शहराच्या गुन्हा शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक एस. एच. महावरकर यांना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. यासाठी हे पद उन्नत करण्यात आले आहे. मुंबईच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलीस बिनतारी विभागाचे उपमहानिरीक्षक एस. डी.  येनपुरे यांची पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या प्रशासन विभागाचे अपर पोलीस आयुक्त जे. डी. सुपेकर यांची पुण्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची पोलीस महासंचालक कार्यालयात आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील उपायुक्त अभिनव देशमुख आता मुंबईतल्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त असतील. त्याचबरोबर मुंबईतले दुसरे उपायुक्त अनिल पारस्कर मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस उपायुक्त एम. रामकुमार यांना मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक शशीकुमार मीना यांना गुन्हे शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे पुण्यातील गट क्रमांक एकचे समादेशक प्रवीण पाटील यांना पुणे शहराच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे.

मुंबईतील पोलीस उपायुक्त संजय पाटील यांची बढतीने अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नागपूर शहर येथे नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या गट क्रमांक सात दौंड जिल्हा येथील राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक वसंत परदेशी यांची पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक एस. डी. आव्हाड यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित येथील कार्यकारी संचालक पी. पी. शेवाळे यांची नागपूर शहराच्या उत्तर प्रादेशिक विभागात अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक ए. एच. चावरिया यांची पुणे शहराच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले वीरेंद्र मिश्रा यांची मुंबईच्या विशेष शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याच्या राज्य राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक दीपक साकोरे यांची नवी मुंबईतील पुणे शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content