Homeएनसर्कलमोघरपाडा-ओवळा गावात पर्यटकांसाठी...

मोघरपाडा-ओवळा गावात पर्यटकांसाठी कांदळवन बोट सफारीही…

शेकडो वर्षांपासून ठाणे शहराला लागून असलेल्या खाडीचे सौंदर्य अधिकाधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न होत असताना या खाडीचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे वन विभागाच्या कांदळवन कक्ष मुंबईमार्फत मोघरपाडा-ओवळा या गावातील ‘कांदळवन’ची समृद्धता आणि अधिवास लक्षात घेऊन निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यटकांना ‘कांदळवन बोट सफारी’ घडवून खाडीतील कांदळवन आणि जीवसृष्टी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

ठाणे खाडीचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा ठरत असताना संवर्धनासह रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. ही योजना विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी आणि सहाय्यक वन संरक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. समृद्ध कांदळवनाचे महत्त्व आणि संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे ठाणे (कांदळवन) वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे म्हणाले.

खारफुटी, फ्लेमिंगो, साप, मासे आदी जलसंपदा याबाबत अनेकांना समग्र माहिती नसते. पण त्यापेक्षाही भरपूर जैवसाखळी खाडीत दडलेली आहे. जलप्रदूषण आणि खाड्यांच्या किनारी व खाडीत होणारे अतिक्रमणाला रोखण्याची खबरदारी वन विभागाच्या कांदळवन कक्ष मुंबईमार्फत घेतली जाते. त्यामुळेच त्याची वाढ होत आहे, असे सांगण्यात आले.

खाडीविषयी सर्वांनाच माहिती असतेच असे नसल्यामुळे तिची माहिती ‘खोलवर’ देऊन, ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरीता वन विभागाने पुढाकार घेतला आहे. रोजगाराची मोठी समस्या लक्षात घेऊन ‘खाडी पर्यटन’ सुरू करताना वनविभाग (कांदळवन कक्ष), मुंबई कांदळवन संधारण घटक आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात ‘कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना’ राबवली जात आहे. त्याबाबत पूर्वतयारी सुरू आहे, असे विक्रांत खाडे यांनी सांगितले.

ठाणे वनपरिक्षेत्र (कांदळवन) अंतर्गत मोघरपाडा-ओवळा गावामध्ये ‘कांदळवन सहव्यवस्थापन समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून घोडबंदर रोड येथील गायमुख बंदरालगत ‘कांदळवन निसर्ग पर्यटन’ केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content