Homeचिट चॅटआंतर को-ऑप. बँक...

आंतर को-ऑप. बँक बुद्धिबळ: मानस सावंत विजेता   

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धा प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंतने सलग दुसऱ्यांदा जिंकली. एमएससी बँकेच्या आदित्य जोशीविरुध्द मानस सावंतने हत्ती व वजिराच्या सहाय्याने आक्रमक चाली रचल्या आणि नवव्या मिनिटाला मानसने आदित्यच्या राजाला शह देत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये एनकेजीएसबी बँकेच्या विनोद मोरेने मुंबै बँकेच्या सचिन काटकरविरुध्द घनघोर युद्ध करीत २८व्या मिनिटाला विजय मिळविला. एनकेजीएसबी बँकेचा रियाल जावकर, डेक्कन मर्कंटाईल बँकेचा उमेश भोईर, म्युनिसिपल बँकेचा संजय साटम, एमएससी बँकेचा सोमनाथ स्वामी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या ४० बुद्धिबळपटूंच्या सहभागाने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सीबीईयु सभागृहात रंगली. फिडे आर्बिटर विशाल माधव व सहाय्यक ओमकार चव्हाण यांनी पंचाचे कामकाज पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे तसेच इतर पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आदी पदाधिकारी कार्यरत होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content