Homeचिट चॅटचेंबूरमध्ये रंगला मल्लखांब,...

चेंबूरमध्ये रंगला मल्लखांब, जिमनॅस्टिक्स खेळाडूंचा कौतुकसोहळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळात चमकदार कामगिरी करण्याऱ्या, तसेच राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेतदेखील पदके जिंकण्याऱ्या खेळाडूंचा कौतुक सोहळा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने मुंबईतल्या चेंबूर येथील नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.

उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकतालिकेत द्वितीय क्रमांक पटकाविला. गेल्या दोन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांप्रमाणे यंदादेखील महाराष्ट्राच्या यशात जिमनॅस्टिक, मल्लखांब खेळाडूंचा मोठा वाटा होता. यंदा महाराष्ट्राने जिमनॅस्टिक्समध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य, तर मल्लखांब खेळात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली, तसेच सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय जिमनॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगले यश संपादन केले. या दोन्ही स्पर्धांतील पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

या समारंभास लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत राठोड, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, सेना उबाठाचे चेंबूर विधानसभा विभागप्रमुख प्रमोद शिंदे, मुंबई जिमनॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष शरद भोसले, नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री शिव छत्रपती पुरस्कार तसेच उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त राहुल ससाणे, सुनील रणपिसे, योगेश पवार, सुनील गंगावणे हेदेखील उपस्थित होते. या खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई जिल्हा जिमनॅस्टिक संघटना, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना, स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र लोकमान्य शिक्षण संस्था, शरद आचार्य क्रीडा केंद्र, सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी या सर्वांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content