Homeहेल्थ इज वेल्थएम्स नागपूरमध्ये उद्यापासून...

एम्स नागपूरमध्ये उद्यापासून महाट्रोपॅकॉनचे आयोजन!

क्लिनिकल पॅरासिटोलॉजीः थिंकिंग बियॉन्ड मायक्रोस्कोपी या संकल्पनेवर या महाट्रोपॅकॉनचे आयोजन करण्यात आले असून त्यात मलेरिया, फाइलेरिया, अमीबियासिस, हायडॅटिड सिस्टिक आजार, न्यूरोसिस्टिसर्कोसिस, हुकवर्म संक्रमण या सारख्या विविध आजारांचा समावेश असलेल्या उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे परिषदेच्या आयोजक सचिव आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितले.

महाट्रोपॅकॉन

एम्स नागपूरच्या सूक्ष्मजीव विभाग, इंडियन अकॅडमी ऑफ ट्रॉपिकल पॅरासिटोलॉजी (भारतीय उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्र अकादमी) आणि विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट्स (व्हीएएमएम) यांच्या सहकार्याने, भारतीय उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्र अकादमी च्या महाराष्ट्र शाखेची पहिली परिषद येत्या 13 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या संदर्भात एम्सच्या परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक यांनी ही माहिती दिली.

परिषदेचे उद्घाटन, उद्या, 13 जानेवारीला सकाळी 11 वाजता, एम्सच्या सभागृहात, प्रमुख पाहुणे, आयएटीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक, प्रा. डॉ. एस. सी. पारिजा यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी, आयएटीपीच्या सचिव डॉ. उज्ज्वला घोषाल, अकादमीच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा अनुराधा डे, सचिव, डॉ. गोपाल अग्रवाल, आयोजक सचिव डॉ. मीना मिश्रा आणि व्हीएएमएमचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सुरपम हे मान्यवरही उपस्थित राहतील.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रतिष्ठित अध्यापक, परजीवी संसर्गाचे निदान करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, मुक्त अमीबियासिस, मलेरिया परजीवी, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग, परजीवी रोगांबाबत ‘एक आरोग्य’ दृष्टीकोन इत्यादी विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांना मार्गदर्शन करतील.

परिषदेचा सांगता समारंभ, 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता होईल. प्रमुख पाहुणे, डॉ. एस. सी. पारिजा यांच्यासह, विशेष सन्माननीय अतिथी म्हणून, न्यायवैद्यक आणि टॉक्सिकोलॉजी विभाग, एम्स, नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक आणि प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ. मनीष श्रीगिरीवार, यवतमाळच्या व्हीएनजीएमसीचे माजी अधिष्ठाता डॉ. अशोक पाठक उपस्थित राहतील.

भारतीय उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्र अकादमी (आयएटीपी) चा महाराष्ट्र शाखेतील विविध पदांची जबाबदारी नव्या नेतृत्वावर सोपवण्यात आली असून, अकादमीच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अनुराधा डे, उपाध्यक्ष म्हणून डॉ. यज्ञेश ठाकर आणि डॉ. मीना मिश्रा, सचिव म्हणून डॉ. गोपाल अग्रवाल, खजिनदार म्हणून डॉ. छाया ए. कुमार आणि इतर राज्य पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content