Homeबॅक पेजपर्यटनासाठी महाराष्ट्राची 'महाराष्ट्र...

पर्यटनासाठी महाराष्ट्राची ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ असेल टॅगलाईन

महाराष्ट्राचे पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभागांतर्गत असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती. ती तफावत आता दूर करण्यात आली असून आता ‘महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो) आणि ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे घोषवाक्य (टॅगलाईन) असेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या पर्यटनस्थळांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी, प्रचार करून  पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी शासन कार्यरत आहे. देशातील एक अग्रगण्य राज्य बनवून मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्याकरीता नुकतेच ‘पर्यटन धोरण 2024’ राज्यात जारी करण्यात आले आहे. येत्या काळामध्ये राज्यातील पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही महाजन यांनी सांगितले.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content