Thursday, December 19, 2024
Homeएनसर्कलऔद्योगिक - व्यापार...

औद्योगिक – व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद : उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपदी जगदीश धनकड यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय- नाशिकच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभासाठी त्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले. यावेळी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र चेंबरचे युवा उद्योजक समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती महामहीम जगदीश धनकड यांची चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदार धैर्यशील माने, संदीप भंडारी.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांचे भारतीय उद्योग जगतातील अफाट योगदान आहे. देशाच्या जडणघडणीत उद्योजकांचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी आणि सरकारमधील महत्वाचा दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या उद्योग, व्यापाराच्या जडणघडणीत चेंबरचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी यांचे हक्कांचे व्यासपीठ चेंबर असून त्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उत्तर महाराष्ट्र शाखेच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र शाखा माइलस्टोन आहे. उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेने महत्त्वाचे कार्य केलेले असून व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व्यापारी उद्योजकांच्या विविध संघटना स्थापन केल्या आहेत. दरम्यान अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. त्यांनी महाराष्ट्र चेंबरचे आमंत्रण स्विकारुन उपस्थित राहण्याची ग्वाही अध्यक्ष गांधी यांना दिली.

Continue reading

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...

छाया कदम प्रथमच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजत आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम 'स ला ते...

२८० स्पर्धकांमध्ये दिनेश राठोड ठरला ‘नवोदित मुंबई श्री’!

अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा विक्रमी सहभाग असलेल्या नवोदित मुंबई श्री स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेला दिनेश राठोड गवसला. परब फिटनेसच्या दिनेशने आपल्यापेक्षा वरच्या गटात ठरलेल्या विजेत्यांवर अत्यंत चुरशीच्या लढतीत मात करीत मुंबई शरीरसौष्ठवाचे सर्वात उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे नवोदित मुंबई श्रीचे...
Skip to content