Homeचिट चॅटजागतिक पर्यटन क्षेत्रात...

जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राला नवा मान!

यंदाच्या WTM ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राने जगासमोर आपली सर्जनशीलता पुन्हा एकदा सिद्ध करत तीन जागतिक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. 6 जुलै ते 31 ऑगस्ट 2021दरम्यान आयोजित या सोहळ्यात 1 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या तीन खाजगी संस्थांच्या उपक्रमांना हे पुरस्कार जाहीर झाले.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गोवर्धन इको व्हिलेजने “डिकार्बोनायझिंग ट्रॅव्हल अँड टुरिझम” श्रेणीत विजेतेपद पटकावले आहे. मुंबईतील नो फूटप्रिंट उपक्रमाने “पर्यटनातील विविधता वाढवणे: आपला उपक्रम किती समावेशक आहे?” या कॅटेगरीमध्ये तर व्हिलेज वे, मुंबई, महाराष्ट्र यांनी “ग्रोइंग द लोकल इकॉनॉमिक बेनिफिट” श्रेणी अंतर्गत पुरस्कार जिंकले आहेत. या तिन्ही उपक्रमांना संबंधित गटात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यासोबतच टायगर ट्रेल्स जंगल लॉजेस, चिचघाट कंझर्व्हन्सीने “डेस्टिनेशन बिल्डिंग बॅक (कोविडनंतर)” श्रेणी अंतर्गत रौप्यपदक जिंकले.

रिस्पॉन्सिबल टुरिझम पार्टनरशिप (RTP), वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटच्या संयुक्त विद्यमानाने  भारत, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि उर्वरित देशांसाठी या जागतिक स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये  भारताने सहापैकी चार जागतिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. तसेच जबाबदार पर्यटन क्षेत्रात भारताची क्षमतासुद्धा स्पष्टपणे दाखवून दिली.

या पुरस्कार सोहळ्यात प्रवास आणि पर्यटनाचे डिकार्बोनायझेशन, साथीच्या आजारातून कर्मचारी आणि समुदाय टिकवून ठेवणे, कोविडनंतरच्या उत्तम पर्यटनस्थळांची उभारणी, पर्यटनातील विविधता वाढवणे: आपला उद्योग किती सर्वसमावेशक आहे?, पर्यावरणातील प्लास्टिक कचरा कमी करणे आणि वाढणे, स्थानिक आर्थिक लाभ या श्रेणींमध्ये भारतीय उपक्रमांना मानांकन प्राप्त होते.

‘व्हिलेज वे’च्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मनीषा पांडे म्हणाल्या की, प्रतिष्ठित WTM ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड जिंकणे, भारत आणि नेपाळमधील आमच्या सर्व टीम सदस्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे, ज्यांनी इतकी वर्षे आणि विशेषतः कोविड काळातही खूप मेहनत केली.

‘नो फूटप्रिंट्स’चे संस्थापक ईशा सिंह आणि हर्षवर्धन तन्वर म्हणाले की, आम्हाला जगभरातील प्रेरणादायी समुदायाचा एक भाग म्हणून ओळखणे हाच मुळात सर्वात मोठा सन्मान आहे.  नो फूटप्रिंट्स, हे नेहमीच एकत्रित मेहनत व त्यांच्या यशोगाथा पुढे आणण्याचे काम करत आले आहे आणि आमचे हे प्रयत्न जागतिक स्तरावर पोहोचणे हे मेहनतीचे फळ मिळाल्याचा अनुभव देते.

महाराष्ट्रा

‘टायगरट्रेल्स जंगल लॉज व कॅम्प’चे भागीदार आदित्य धनवटे म्हणाले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की टायगरट्रेल्स जंगल लॉजेसने जागतिक ट्रॅव्हल मार्केटमध्ये रौप्य पुरस्कार जिंकला आहे. हा आमचा दुसरा रौप्य पुरस्कार आहे यापूर्वी जागतिक जबाबदार पर्यटन पुरस्कार, लंडनला “वन्यजीव संरक्षणातील सर्वोत्कृष्ट” श्रेणीतसुद्धा आमच्या कामाची दखल घेतली गेली होती. हा पुरस्कार स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने सरावलेल्या शाश्वत पर्यटनाच्या आधारावर दिला जातो. नॅशनल पार्कला लागून असलेले वन्यजीव संरक्षण, लॉज व त्याभोवती अधिवास पुनर्संचयित करणे, जलसंधारण, यामाध्यमातून निसर्ग, वन्यजीव आणि पर्यटक या साऱ्यांना सांभाळून एक अद्भुत तयार करणे, आणि हे सर्व करत असताना अत्यंत कमी इको-फूटप्रिंट ठेवणे हे आमच्या कामाचे स्वरूप आहे.

याचे मोठे यश म्हणजे उपक्रम राबवत असताना याच कालावधीत शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. अनेक ठिकाणी निसर्ग संवर्धनातून वन्यजीवन पुन्हा एकदा समृद्ध होत आहे. या उपक्रमातून विविध समुदायांसाठी नवीन आणि स्थिर उपजीविका निर्माण झाली आहे. हे समुदाय पर्यटन उपक्रमांमध्ये सर्वोत्तम सवयी बाळगून शाश्वत विकासाची कक्षा रुंदावतात. नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि नूतनीकरणाचे मध्यस्थ म्हणून जबाबदार पर्यटनाच्या मूल्याबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवतात, असेही ते म्हणाले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content