Homeएनसर्कलम्युनिक-बेंगळुरू व फ्रँकफर्ट-हैदराबाद...

म्युनिक-बेंगळुरू व फ्रँकफर्ट-हैदराबाद मार्गावर लुफ्थांसाची उड्डाणे

भारतातील आपल्या प्रबळ उपस्थितीला अधिक दृढ करत लुफ्थांसाने दोन नवीन मार्गांची घोषणा केली आहे. म्युनिक ते बेंगळुरू आणि फ्रँकफर्ट ते हैदराबाद अशी ही उड्डाणे असतील. म्युनिक-बेंगळुरू मार्गावरील नवीन फ्लाइट्स आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेतील. पहिली फ्लाइट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी उड्डाण घेणार आहे. फ्रँकफर्ट-हैदराबाद फ्लाइट आगामी हिवाळ्यामध्ये कार्यसंचालनाला सुरूवात करेल. या संयोजित फ्लाइट्स ग्रुपसाठी एशिया पॅसिफिकमध्ये पहिल्या नवीन मार्गांचे प्रतिनिधीत्व करतील.

या विस्तारीकरणामधून वाढत्या तरूण श्रमजीवी व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता करत भारतीय बाजारपेठेतील आपली उपस्थिती दृढ करण्‍याप्रती लुफ्थांसाचा दीर्घकालीन दृष्टीकोन दिसून येतो. ब्रॅण्डचा विशेषत: कोविडनंतरच्या युगामध्ये ग्राहकांना बिझनेस असो किंवा फिरणे असो, त्यांच्या आंतरराष्ट्रीय ट्रीप्सदरम्यान सर्वात प्रिमिअम प्रवासाचा अनुभव देत भारतातील न साधण्यात आलेल्या विकाससंधींचा फायदा घेण्याचा त्यांचा मानस आहे.

भारतात ५०हून अधिक साप्ताहिक सेवांसह लुफ्थांसा ग्रुपची जवळपास शतकापासून कार्यरत असण्याची परंपरा आहे आणि हे नवीन मार्ग उपखंडातील आघाडीचा युरोपियन एअरलाइन ग्रुप म्‍हणून कंपनीची उपस्थिती अधिक दृढ करतील.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content