Homeपब्लिक फिगरलोकसभा अध्यक्ष ओम...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लंडनमध्ये!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत संविधान स्वीकारल्याची 75 वर्षे साजरी करत आहे. भारतीय राज्यघटनेने देशात परिवर्तनात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईपर्यंत म्हणजे 2047पर्यंत भारत एक विकसित देश बनलेला असेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजवर मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची उत्कृष्ट परंपरा राहिली असून भारत ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली चैतन्यपूर्ण लोकशाही आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग असतो. अशा  सहभागातून आपल्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दिसून येते. भारतातील लोकशाही तळागाळापासून संसदेपर्यंत खोलवर रुजलेली आहे. देश धोरणात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, राजकारण आणि समाजातील लिंगाधारित तफावत भरून काढत आहे, असे ते म्हणाले. संसदीय लोकशाही म्हणून भारताची कामगिरी अधोरेखित करताना बिर्ला यांनी आवर्जून नमूद केले की विविधता असूनही, संसदीय संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात भारत यशस्वी झाला आहे.

भारत आणि ब्रिटनमधील संसदीय सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन करत बिर्ला यांनी दोन्ही देशांदरम्यान संसदीय ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची अधिकाधिक देवाणघेवाण करण्यावर भर दिला. दोन्ही देशांच्या युवा आणि महिला संसद सदस्यांनी वारंवार संवाद साधायला हवा, असे ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध दृढ झाले आहेत. याचा दोन्ही देशांतील लोकांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा संदर्भ देत बिर्ला यांनी नमूद केले की दोन्ही देश अन्न आणि आरोग्य सुरक्षेच्या मानवतावादी समस्या सोडवण्यासाठी आणि हवामान बदलासारख्या वाढत्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content