मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विदुषी शाश्वती मंडल यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल.
शाश्वती मंडल या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असून संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांनी त्यांची आई कमल मंडल यांच्याकडे घेतले. नंतर बाळासाहेब पूँछवाले यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली व त्यांच्याकडे टप्पा गायनाचे प्रगत शिक्षण घेतले. पूर्णिमा चौधरी यांच्याकडे ठुमरी, गुंडेचा बंधूंकडे ध्रुपद आणि सरबत हुसेन यांच्याकडे गझल गायकीचे प्रशिक्षण घेतले. त्या आकाशवाणीच्या टॅाप ग्रेड कलाकार असून प्रतिष्ठित संगीत संमेलनांमध्ये त्यांनी गायकी सादर केलेली आहे.
त्यांना सूरसिंगार संसदेतर्फे “सूरमणी” हा किताब मिळाला आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांना अभय दातार तबला व डॅा. मौसम संवादिनीवर साथ करतील. अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

