Homeकल्चर +'एप्रिल पुल'मध्ये आता...

‘एप्रिल पुल’मध्ये आता ऐका ‘झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड’

आपल्याला पु. ल. देशपांडेंबद्दल माहिती आहे. त्यांच्याविषयी प्रेम, आवड आणि आस्था आहे. कोट्यधीश पु. ल. म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कारण, त्यांच्या शाब्दिक विनोद आणि अनेक कोट्या प्रसिद्ध आहेत. साधारण एप्रिल महिना सुट्ट्यांचा असतो, मोकळा असतो आणि सांस्कृतिक वातावरणदेखील सुरू झालेले असते. एप्रिल-मेमध्ये अनेक उपक्रम होत असतात. त्यातूनच संपूर्ण महिनाभर चालेल असा उपक्रम करण्याचे ‘स्टोरीटेल’ने ठरविले. त्यानुसार ‘एप्रिल पुल’ ही संकल्पना राबवली जात आहे.

पु. ल. देशपांडे हे अख्या विश्वातील मराठी रसिकांचे लाडके व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या साहित्याने आबालवृद्धांना वेड लावलेलं आहे. सहजसाध्या प्रसंगांतून, व्यक्तिचित्रांतून विनोदनिर्मिती करून पु. लं.नी सर्वांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय कथा मातब्बर नामवंत कलावंतांच्या आवाजात स्टोरिटेलवर ऐकताना रसिकांना खळखळून हास्यानंद मिळत आहे. ‘एप्रिल पुल’ या संकल्पनेला रसिकांचा भन्नाट प्रतिसाद लाभत असून दर काही दिवसांनी प्रकाशित होणारे नवे ‘ऑडिओ बुक्स’ ऐकण्यासाठी त्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे जाणवत आहे.

‘एप्रिल पुल’मध्ये स्टोरीटेलने रिलीज केलेल्या ऑडिओ बुक्समध्ये ‘गुण गाईन आवडी’, ‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘खिल्ली’, ‘उरलं सुरलं’, ‘चार शब्द’, पूर्वारंग या पुस्तकांचा समावेश आहे. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अविनाश नारकर, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, आस्ताद काळे, सौरभ गोगटे, नचिकेत देवस्थळी, संदीप खरे यांनी पु. लं.च्या लोकप्रिय साहित्यकृतींना आपल्या आवाजाचा नवा साज स्टोरीटेल मराठीचे व्यासपीठ निवडले आहे. या दिग्गजांच्या आवाजात पु. लं.च्या लोकप्रिय पुस्तकांतील कथांचे तीसहून अधिक ‘ऑडिओ बुक्स’ स्टोरिटेल रिलीज करीत आहे. येत्या आठवड्यात अभिनेते अविनाश नारकर यांच्या आवाजात ‘चार शब्द’ मधील ‘झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड’, त्यासोबतच ‘पूर्वारंग’ मधील कथा ऐकता येणार आहेत.

‘एप्रिल पुलमधील ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी

https://www.storytel.com/in/en/authors/53909-Pu-La-Deshpande

https://www.storytel.com/in/en/books/char-shabd-zombi-2379325

https://www.storytel.com/in/en/books/char-shabd-mama-aani-tyanchi-gajali-2379398

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content