Homeचिट चॅटऐका शिवशाहीर बाबासाहेब...

ऐका शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवरचा ‘बेल भंडारा’!

ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज २९ जुलैला वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्तानं ‘स्टोरीटेल मराठी’ने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉ. सागर देशपांडेलिखित ‘बेल भंडारा’ हे चरित्र रसिकश्रोत्यांच्या आवडत्या ‘ऑडिओबुक’मध्ये आणले आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य शब्दबद्ध करण्याचा डॉ. सागर देशपांडे यांचा हा प्रयत्न त्यांच्या शतकोत्सवी वर्षात ऐकायला मिळणं हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

बाबासाहेब पुरंदरे, हे नाव आज महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व नेमकं घडलं कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात आहे. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं. त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु.ल. देशपांडेही होते. परंतु बाबासाहेबांनी हे कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमय होऊन राहिले. मात्र ‘बेल भंडारा’च्या निमित्ताने डॉ. सागर देशपांडे यांच्या ११ वर्षांच्या अथक परिश्रमानं आपल्यासाठी हा ‘भंडारा’ उपलब्ध झाला आहे.

या चिरित्रातून बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं असं काही दर्शन रसिकांना घडतं की ते ऐकताना नकळत आपण बाबासाहेबांसोबतच वावरत असल्याचा भास होत राहतो. ‘बेल भंडारा’ ऐकताना श्रोत्यांच्या मनात असा विचार नक्की येतो की एका व्यक्तीत एवढे गुण कसे काय असू शकतात? एवढी मोठमोठ्ठाली अशक्यप्राय वाटणारी कामं बाबासाहेब कसे काय यशस्वी करून दाखवतात? बाबासाहेब सर्वोत्तम वक्ता आहेत, लेखक आहेत, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे निर्माते आहेत व सर्वात मुख्य म्हणजे कुशल संघटक आहेत..

ते जे करतात ते सर्वोत्तम दर्जाचे असते. हे सगळं एका व्यक्तीला एकाच जन्मात कसं काय शक्य आहे या विचारांनी श्रोते ठायीठायी हरवतात.. मग वाटतं, बाबासाहेब म्हणजे एक अद्भुत चमत्कारच असावेत! अशा या आपल्या बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व, त्यांचा जीवनप्रवास मर्यादित शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडणं म्हणजे एकप्रकारे लेखकासमोर शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. ते डॉ. सागर देशपांडेंनी उत्तमरित्या पेललं आहे. याला नचिकेत देवस्थळी या अभिनेत्याचा फ्रेश आवाज लाभला आहे.

‘बेल भंडारा’तून बाबासाहेबांच्या जीवनाचा समग्र अनुभव घेण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ हे एप डाऊनलोड करावं लागणार आहे. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जाते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content