Homeचिट चॅटलेनदेन क्‍लबकडून फिक्‍स्‍ड...

लेनदेन क्‍लबकडून फिक्‍स्‍ड मॅच्‍युरिटी इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लान लॉन्‍च!

भारतातील सर्वात मोठे पी२पी लेण्डिंग व्‍यासपीठ लेनदेन क्‍लबने नुकताच आधुनिक, मुदत-आधारित पी२पी प्‍लान एफएमपीपी म्‍हणजेच फिक्‍स्‍ड मॅच्‍युरिटी पीअर-टू-पीअर प्‍लान लॉन्‍च केला. हा प्‍लान गुंतवणूकदारांना प्रति गुंतवणूक किमान १०,००० रूपयांसाठी प्रतिवर्ष १० ते १२ टक्‍के अपेक्षित परताव्‍यांसह सक्षम करतो. कंपनीचा १ दशलक्ष गुंतवणूकदारांना समाविष्‍ट करून घेण्‍याचा आणि आर्थिक वर्ष २०२३च्‍या अखेरपर्यंत एफएमपीपीमधून १० बिलियन रूपयांच्‍या एयूएमचा टप्‍पा गाठण्‍याचा मनसुबा आहे.

२ दशलक्षहून अधिक गुंतवणूकदारांना सेवा देणारी आरबीआय-मान्‍यताकृत एनबीएफसी-पी२पी लेनदेन क्‍लबने एफएमपीपी अशाप्रकारे डिझाइन केले आहे की गुंतवणूक रक्‍कम कर्जदारांच्‍या व्‍यापक समुहामध्‍ये उच्‍च प्रमाणात विभागली जाते, ज्‍यामुळे डिफॉल्‍ट दर लक्षणीयरित्या कमी होतो आणि गुंतवणूकदारांना जोखीममुक्‍त परतावे मिळतात. नवीन एआय- व एमएल-आधारित अल्‍गोरिदम्‍स पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत, कारण ते कंपनीने स्‍थापनेपासून संपादित केलेल्‍या प्रोप्रायटरी फर्स्‍ट पार्टी डेटावर सर्वोत्तमरित्‍या समाविष्‍ट व प्रशिक्षित करण्‍यात आले आहेत. यामुळे एफएमपीपी अद्वितीय वैशिष्‍ट्य म्‍हणून उच्‍च विविधता देण्‍यामध्‍ये सक्षम होते, जे जोखीम कमी करतात आणि स्थिर परताव्‍यांची खात्री देतात.

लेनदेन क्‍लबचा एफएमपीपी इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लान हा १, २, ३, ४ किंवा ५ वर्षांच्‍या स्थिर मुदतींसह मुदत-आधारित गुंतवणूक प्‍लान आहे. गुंतवणूक केलेला निधी मुदतीदरम्‍यान अनेक वेळा पुन्‍हा गुंतवला जातो, ज्‍यामुळे गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्‍याज मिळण्‍यासोबत प्रतिवर्ष जवळपास १२.२१ ते १५.२५ टक्‍के वार्षिक उत्‍पन्‍न मिळते. एफएमपीपी बाजारपेठेशी निगडित नसलेला पर्यायी गुंतवणूक पर्याय आहे, ज्‍यामुळे बाजारपेठेतील अस्थिरतेदरम्‍यान गुंतवलेल्‍या भांडवलाचे नुकसान होण्‍याच्‍या जोखीम कमी होतात आणि म्‍हणून गुंतणूकदारांना अधिक परतावे मिळण्‍यासोबत त्‍यांच्‍या गुंतवलेल्‍या रक्‍कमेच्‍या सुरक्षिततेची अतिरिक्‍त खात्री मिळते. या उत्‍पादनाच्‍या रचनेमुळे ते एफडी, गोल्‍ड बॉण्‍ड्स इत्‍यादीसारख्‍या इतर निश्चित्त उत्‍पन्‍न मालमत्तावर्गांशी स्‍पर्धा करते. 

एफएमपीपीच्‍या लॉन्‍चबाबत लेनदेन क्‍लबचे सहसंस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्‍हणाले की, एफएमपीपी हे आजच्‍या कमी एफडी दर व अस्थिर शेअर बाजार स्थितीच्‍या युगामधील अग्रणी, ग्राहक-केंद्रित गुंतवणूक ऑफरिंग आहे. या उत्‍पादनामध्‍ये भांडवल वाटपासाठी पूर्णत: नवीन अल्‍गोरिदम आहे. हे उत्‍पादन मागील १८ महिन्‍यांपासून विकास व चाचणीच्‍या टप्‍प्‍यावर राहिले आहे आणि आता पूर्णपणे कार्यरत करण्‍यात आले आहे. लेनदेन क्‍लबचा एफएमपीपी इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लान रिटेल असो वा एचएनआय गुंतवणूकदारांच्‍या सर्व वर्गांसाठी अल्‍टरनेट इन्‍व्‍हेस्‍टमेंट अव्‍हेन्‍यू आहे.

आमचे ९९ टक्‍क्‍यांहून अधिक गुंतवणूकदार प्रतिवर्ष १० ते १२ टक्‍के स्थिर परतावे प्राप्‍त करण्‍याची खात्री घेण्‍यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. नवीन सुधारित अल्‍गोरिदम या मुलभूत उत्‍पादन तत्त्वामध्‍ये उच्‍च प्रमाणात निश्चिततेची भर करते आणि ग्राहकांप्रती विश्‍वास, पारदर्शकता व स्थिरतेच्‍या आमच्‍या तत्त्वाला अधिक दृढ करते, असेही ते म्हणाले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content