Homeटॉप स्टोरी'लाडकी बहीण' राहणार...

‘लाडकी बहीण’ राहणार कायम!

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत  महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री भावाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवसेनेचे सचिव आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी माध्यमांना सांगितले.

नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटन्ट यांच्या माध्यमातून वकील ओवैस पेचकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, या योजनेसह इतर योजनांचा शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, या शंकेवर

लाडकी बहीण

आधारित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर शिक्कामोर्तब केले असल्याचे त्या म्हणाल्या.

समाजातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये साह्य देणारी योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे सरकारची प्रतिमा उंचावली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याने त्यांनी या माध्यमातून या योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून यावर हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून याचिका फेटाळली, असेही कायंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील आव्हान फेटाळल्यानंतर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पहिला हप्ता १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून दिला जाणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत महिलांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढल्याचे सांगितले आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content