कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग’ कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात झाला. कार्यक्रमात कोमसाप दादर शाखामधील ज्येष्ठ ते तरुण अशा कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला व आपले स्वरचित काव्य सादर केले.
कार्यक्रमासाठी आमंत्रित अतिथी म्हणून विद्या प्रभू, कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष व जगदीश भोवड, पत्रकार व कोमसाप मुंबई जिल्हा प्रतिनिधी तर प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप दादर शाखाध्यक्ष अंजना कर्णिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमास दिलीप गांगल, स्कॉप अध्यक्ष, चंद्रकांत कवळी, सचिव, सुरेंद्र पोतदार, समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांनी अगदी मनसोक्त कविता आणि गीतांचा आस्वाद घेतला. अगदी आनंददायी वातावरणात सदर कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादर शाखा सचिव कवी मनोज धुरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता दादर शाखेचे अध्यक्ष, कार्यवाह यांच्यासोबत सहकार्यवाह कवी समीर बने यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात विद्या प्रभू, अंजना कर्णिक, डॉ. शिल्पा जोशी, कवी चंद्रकांत कवळी, मनोज धुरंधर, समीर बने, सुरेश कापडोसकर, निर्मला देऊसकर, सुप्रिया ठोकळ, युवा प्रतिनिधी वनश्री राडे व स्कॉपच्या काही सभासदांनी आपापल्या कविता, गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.