Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेजरीवालांचे राजकीय भवितव्य...

केजरीवालांचे राजकीय भवितव्य ८ फेब्रुवारीला निश्चित!

राजधानी दिल्लीत सध्या असलेले आम आदमी पार्टीचे सरकार (निशाणी- झाडू) कायम राहणार का, हे येत्या ८ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस (निशाणी- हाताचा पंजा) तसेच भारतीय जनता पार्टी (निशाणी- कमळ) हे या राज्यातले प्रमुख पक्ष असून त्यांचेही भवितव्य यादिवशीच निश्चित होईल. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा तसेच राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये यावेळी मुकाबला होणार आहे.

केजरीवाल

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना जारी केली जाईल. त्यादिवसापासून उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १७ जानेवारीपर्यंत उमेदवार आपले उमेदवारीअर्ज दाखल करू शकतील. १८ जानेवारीला उमेदवारीअर्जांची छाननी होईल. २० जानेवारीपर्यंत उमेदवारअर्ज मागे घेता येतील. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे कुमार यांनी जाहीर केले.

केजरीवाल

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा असून सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. एकंदर एक कोटी ५५ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावू शकतील. त्यात ८३ लाख ८९ लाख पुरूष तर ७१ लाख ७४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. साधारण दोन लाक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ८५ वर्षांवरील मतदारांकरीता आयोगाने ऑनलाईन मतदानाची सोय उपलब्ध केली ाहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर केलेल्या आरोपांना धुडकावून लावत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावाही यावेळी केला.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content