Friday, May 23, 2025
Homeकल्चर +के. एस. चित्रा...

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित “माझी प्रारतना” ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण शेतात रोमांस करत एकमेकांच्या मिठीत हरवलेले पाहू शकतो. यांच्यात हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहेत. दोघंही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमाचे धागेदोरे घट्ट बांधताना दिसत आहेत. एकमेकांबद्दलची ओढ या गाण्यातून दिसत आहे. गायकांनी गाण्यात अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे. हे एक अप्रतिम लव्ह सॉंग आहे जे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. विश्वजित सी टी ह्यांनी या गाण्याला संगीत दिलय, तर सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा ह्यांनी आपला आवाज दिलाय. गाण्याचे बोल हे पद्माराज नायर ह्यांचेच आहेत.

विशेष म्हणजे सुप्रसिद्ध भारतीय गायिका के. एस. चित्रा, ज्यांना “नाइटिंगेल ऑफ साऊथ इंडिया” म्हणून ओळखलं जातं, यांनी आपली मराठी गाण्याची कारकीर्द सुरू केली ती “माझी प्रारतना” या चित्रपटातील गाण्याद्वारे. याच गाण्याद्वारे त्यांनी मराठी संगीतविश्वात एक भावनिक आणि सुंदर पाऊल टाकलं. चित्रा ह्यांनी याबद्दल सांगितलं की, माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मी ‘माझी प्रारतना’ या मराठी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. मराठी ही माझी नेहमीची भाषा नसल्यामुळे यात गायन करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण पद्माराज यांनी उच्चार आणि शब्दोच्चार यात फार मोलाची मदत केली. आणि त्या भावनेला अंत:करणातून अनुभवून मी गाणं उत्तम प्रकारे सादर करू शकले.

मला मराठीत एक सुंदर गाणं गाण्याची इच्छा होती आणि “माझी प्रारतना” या चित्रपटाद्वारे मला तीन गाणी गायचं सौभाग्य लाभलं. ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’, ‘तूच माझी मूळ’ आणि ‘सांगायचं आहे’ (विठ्ठला) ही गाणी पद्माराज यांनी लिहिलेली असून, संगीत दिग्दर्शन विश्वजीत सी टी यांचं आहे. विश्वजीतजी हे अतिशय उत्तम संगीतकार आहेत आणि त्यांच्यासोबत मी अनेकवेळा काम केले आहे आणि प्रत्येकवेळा मला त्यांच्यासोबत काम करून आनंद मिळतो. ‘माझी प्रारतना’ हा चित्रपट तुम्ही ९ मे रोजी नक्की पाहा आणि त्यातील संगीत, कथा आणि अभिनयाचा आनंद घ्या, असेही त्या म्हणाल्या.

खरं प्रेम ते आहे ज्यामध्ये स्वत:च्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा सर्वात जास्त विचार केला जातो. अशीच प्रेमाची एक नवी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा नवा सिनेमा महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेली संगीतप्रधान प्रेमकथा आहे. या चित्रपटात पद्माराज आणि अनुषा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार आपल्याला दिसणार आहेत.

Continue reading

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...

कुर्ल्यात शालेय मुलांचे कबड्डी शिबिर संपन्न

गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने ज्ये‌ष्ठ राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानात शालेय मुलांसाठी पाच दिवसांचे मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले. 50पेक्षा जास्त शालेय...
Skip to content