आयकर विभागाची आलिशान स्थावर मालमत्ता विकासकांविरूद्ध शोध आणि तपासणी मोहीम पणजी येथील आयकर विभागाच्या तपास शाखेने 12 जून 2023 रोजी मेसर्स विनार ग्रुप आणि मेसर्स इसप्रवा ग्रुप या दोन प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांविरूद्ध (डेव्हलपर) व्यापक शोध आणि तपासणी मोहीम सुरू केली.
गोवा, मुंबई, दिल्ली, नोएडा आणि अमृतसरसह प्रमुख शहरांमध्ये असलेल्या एकूण 31 ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बंगळुरू, दिल्ली, मुंबई, गुडगाव आणि डेहराडून येथे तैनात आयकर विभागाचे पथक काल सकाळपासून छापे टाकत आहेत.

भारतातील विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या, वायनार ग्रुप आणि इस्प्रावा ग्रुप या दोन्ही कंपन्यांची रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वदूर उपस्थिती आहे. याव्यतिरिक्त, त्यांचा ग्रुप हॉस्पिटॅलिटी विभागात कार्यरत आहे. कंपनी भारतातच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियामध्ये अपार्टमेंट आणि व्हिला भाड्याने देते.

