Homeटॉप स्टोरीसुशांत सिंगचा मृत्यू...

सुशांत सिंगचा मृत्यू आघाडी सरकारमधल्या तरूण मंत्र्याला भोवणार?

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या रूप कुमार शाह या व्यक्तीने सुशांत सिंग राजपूतची आत्महत्त्या नसून त्याची हत्त्या झाल्याचे सांगितल्यामुळे याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीत ट्विस्ट आल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अब बेबी पेन्ग्विन दूर नही है… असे जाहीर जाहीर केल्यामुळे या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधले एक तरूण मंत्री लवकरच गजाआड होण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

रूप कुमार शाह सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह नेतानाचा एक व्हिडिओ आज आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला. हाच रूप कुमार सुशांत सिंहच्या शवविच्छेदनाच्या वेळीही उपस्थित होता. अखेर सत्य बाहेर येत आहे. अब बेबी पेन्ग्विन दूर नही है… न्याय होणार!, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

चार दिवसांपूर्वीच राणे यांनी नागपूर विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करताना तेथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कोणाचा दबाव होता, याची माहिती तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पाहिजे, असे म्हटले होते.

सुशांत

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात एटोप्सी करणारी व्यक्ती रूप कुमार शाह यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले की, तसे असेल तर त्याचे स्वागतच आहे. कारण तुम्ही घटनाक्रम बघितला पाहिजे. जिलेटिनच्या प्रकरणांमध्ये असलेला मनसुख हिरेन याला मारण्यात आले. का मारले, कोणी मारले, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. सुशांत सिंगचीपण हत्त्या झाली. कारण त्याच्याकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबद्दलची काही माहिती होती.

रूप शाह यांनी स्पष्टच म्हटले आहे की सुशांत सिंगची आत्महत्त्या नसून ती हत्त्या आहे.  त्याचा मृतदेह जेव्हा पोस्टमार्टमसाठी आणला गेला तेव्हा त्याचे हातपाय पहिल्यापासूनच तोडले गेल्याचे दिसून आले. आता रूप शाह, हा कोणासाठी काम करतो? सरकारचे… तेव्हा सरकार कोणाचे होते? उद्धव ठाकरेंचे… मग माहिती त्यांनी नको का द्यायला, असा सवाल राणे यांनी केला होता.

या सर्व तपासामुळे वरूण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का असे विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना या सरकारमधील एक तरुण मंत्री वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये कसा जायचा, अवेळी डिनोच्या घरी कसा जायचा? तेरा तारखेच्या रात्री सुशांत सिंगच्या घरी कोण गेले होते? जॉगर्स पार्कमधल्या रहिवाशांनी पाहिलेले आहे. म्हणून आता हे सगळे पळत आहेत. बॉम्ब, लवंगीचे फुसके बार फोडत आहेत. त्यांनी अडीच वर्षांत जे पेरले ते उगवणारच. हे सर्व पुरावे पोलिसांकडे जाणार. रूप शाह यांच्या जबाबामुळे सीबीआयला बळ आले आहे. सुशांत सिंगच्या प्रकरणाची सीबीआय अजून चौकशी करत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल, असेही राणे म्हणाले होते.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content