Friday, November 22, 2024
Homeमाय व्हॉईससलमान शूटआऊट प्रकरणात...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे गुंड किंवा पंटर्स भाड्याने घेतो व आपली कामे उरकतो असे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जात आहे. अभिनेता सलमान खान याच्या घरावरील शूटआऊटसाठी लॉरेन्सने छोटा शकीलची मुले वापरली अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. छोटा शकीलची मुले म्हणजे पुन्हा कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध! लॉरेन्सचा मुंबईत बेस नसल्याने तो दाऊद वा छोटा राजनच्या माणसांकरवी आपली कामे करवून घेत असल्याचा संशय एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला.

आयुक्तांच्या कार्यालय आवारात

मुंबईत महात्मा फुले मंडईच्या समोर असलेल्या मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात चार-पाच इमारती आहेत. त्यात एका इमारतीत आयुक्त, विशेष आयुक्त, सह पोलीस आयुक्तांची कार्यलये आहेत. व अवघ्या दहा पावलांवर असलेल्या दुसऱ्या इमारतीत गुन्हे शाखेचे कार्यालय असून सह पोलीस आयुक्त (गुन्हे), अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी अनेक अधिकारी तेथे बसतात. त्यांची कार्यालयेच तेथे आहेत.

तळ मजल्यावर गुन्हे शाखेची कोठडी आहे. या कोठडीतच सलमान खान शूटआऊट प्रकरणातील चार संशयित आरोपी होते. यापैकी अनुज थंमन याने दोन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्त्या केली. कोठडीसाठी दिवसरात्र पहारेकरी असतात. महत्वाचे म्हणजे येथे सीसीटीव्हीही तैनात असतात. याशिवाय दिवसरात्र येथे बऱ्यापैकी वर्दळ असते. हे इतके विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे इतका संवेदनशील परीसर असतानाही आत्महत्त्या झाली हे पचायला जरा अवघड आहे.

खरं तर या अनुजचा रोल केवळ पिस्तुले पुरवण्याइतपतच होता असे खुद्द पोलिसांनीच सांगितले आहे. आता गुन्हेविषयक माहिती काढून घेण्यासाठी पोलिसांनी अनुजला कानाखाली वाजवल्याच असतील, नव्हे जाळ काढला असेल. पण इतके करूनही त्याने काही माहिती दिली असेल असे वाटतं नाही. कारण या चारही आरोपीनी काहीही माहिती दिल्याचे वाचनातही नाही आणि पोलीसही काही बोलत नाहीत. म्हणजेच हा तपास एकप्रकारे डेड एन्डवर आलेला दिसतो.

हे चिल्लर आरोपी सोडले तर पोलिसांना अजून याप्रकरणी कुणी तगडा आरोपी सापडलेला नाही हे दिसतच आहे. गुन्ह्यासाठी शस्त्रे पुरवणारा हा गुन्हेगारच असला तरी आरोपपत्रात त्याचा क्रमांक चवथा वा पाचवाच असतो. आणि असे भाडोत्री गुंड तपशीलात कधीच जात नाहीत. खाली फटाका फोडना है.. या इशाऱ्यावर ते काम करतात. मात्र फटाका कुठे फोडायचा हे मात्र ही मंडळी न विसरता विचारतात व तेच पक्के लक्षात ठेवतात.

आता नेहमीप्रमाणे अनुजच्या नातेवाईकांनी हा पोलीस कोठडीतील खूनच असल्याचा आरोप केला आहे. पोलीस कोठडीत मृत्यू झाला तर त्याची दांडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केलीच जाते, हे सांगायला काही कुणाची गरज नाही. अशी चौकशी बंधनकारकच असते. सध्या लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष गुंतलेले असल्याने अजूनतरी याप्रकरणी राजकीय आरोप-प्रर्त्यांरोप सुरु झाले नाहीत. हे एका अर्थाने बरेच झाले. विशेष म्हणजे ज्याच्या गंभीर प्रकरणावरून हे रामायण सुरु झाले तो सलमान खान मात्र परदेशात मस्त फिरत आहे. खरंतर या संपूर्ण प्रकरणात सलमानचीही चौकशी होणे गरजेचे आहे. निदान काही प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी त्याच्याकडून घेणे आवश्यक आहे.

छायाचित्रं- वसंत प्रभू व प्रवीण वराडकर

छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...

परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

भारतभरातील आरोग्यसेवा क्षेत्राचा कायापालट घडवणारा क्रांतिकारी टप्पा पार करत ईझेरेक्स, या आद्य आरोग्यसेवा कंपनीने भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इम्जेनेक्स इंडियाबरोबर नुकताच एक धोरणात्मक सामंजस्य ठराव (एमओयू) केला आहे. या सहयोगामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील दोन नवोन्मेष्कारी कंपन्या एका सामाईक...
Skip to content