Homeटॉप स्टोरीजागावाटपाच्या वेळी ‘मोठा...

जागावाटपाच्या वेळी ‘मोठा भाऊ’ अडचणीचा ठरणार?

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा लोकसभेसाठी 19 जागेचा राग आळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत आपणच मोठे भाऊ असल्याचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतली मतभिन्नता आणखीनच तीव्र झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी यावर जरी मवाळ भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी महाविकास आघाडीतला मोठा भाऊ अनेकांना त्रासदायक ठरणार असल्याची ही चिन्हे आहेत, असे जाणकारांना वाटते.

भाऊ

दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडी सर्व जागा लढवेल आणि त्यातल्या 19 जागा तेव्हाच्या शिवसेनेच्या होत्या, तेवढ्या जागा आमच्या कायम राहतील, असा दावा केला. आज याचा पुनरूच्चार करताना पुन्हा त्यांनी 48 पैकी 19 जागा शिवसेनेच्या असतील असे नमूद केले. यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला असंतोष खदखदत असतानाच आज एका मेळाव्यात अजित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला आम्ही मोठा भाऊ मानत आलो आहोत. परंतु मागच्या निवडणुकीत विधानसभेतले आकडे दाखवून देतात की आम्ही 54 आहोत तर तुम्ही 44 आहात. त्यामुळे आता मोठे भाऊ आम्हीच आलो आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अजित पवार म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही पूर्वीपासून कधीही मोठेपणा मिरवला नाही, असे सांगितले. अनेक वर्षे आमची सदस्यसंख्या नेहमीच जास्त राहिली. मात्र आम्ही सर्वांना आमच्या बरोबरीनेच नेले. सर्वांशी समन्वयातच संबंध ठेवले, असे ते म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content