Homeन्यूज ॲट अ ग्लांसइराणचे प्रमुख खामेनेई...

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. खामेनेई यांच्या घरावर सात मिसाईल डागण्यात आल्याचे समजते. यामध्ये इराणचे सर्वेसर्वा अली हुसैनी खामेनेई ठार झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच इस्त्रायलचे प्रमुख बेंजामीन नेतन्याहू यांनी काल रात्री उशिरा याची घोषणा केली. इराणच्या सरकारकडूनही याला दुजोरा दिला आहे. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून ठिकठिकाणी मातम सुरू झाला आहे. इराणमध्ये एका आठवड्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अली खामेनेई यांचे चिरंजीव मोजतबा खामेनेई यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च नेतेपदी नेमणूक करण्यात आली आहे.

खामेनेई

अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनेई यांचे सल्लागार शामखानीही मारले गेले असून लष्करप्रमुख पाकपूरही ठार झाल्याचे कळते. जनरल वाहिदी यांनी इराणी सैन्याची कमान सांभाळली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता इराकनेही या युद्धात उडी घेतली असून इराकमधल्याच अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केल्याचे समजते. इराकमध्येही जनता खामेनेईच्या मृत्यूचा शोक करत रस्त्यावर उतरली असल्याचे चित्र आहे. इस्त्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर हल्ला करण्यात आला आहे. मेहराबाद विमानतळावरही काही मिसाईल डागण्यात आले. अमेरिका आणि इस्त्रायलचे ‘किल खामेनेई’ ऑपरेशन सुरू झाले होते. इराणनेही अमेरिका तसेच इस्त्रायलवर पलटवार केला असून आखाती देशांतल्या अमेरिकी तळावर तसेच इस्त्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल डागल्याचे बोलले जाते. रशियानेही अमेरिकेच्या हल्ल्याविरोधात प्रतिक्रिया दिली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे रंग दाखवल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, इराण तसेच शेजारच्या इराकने आपल्या हवाई सीमा उड्डाणासाठी प्रतिबंधित केल्या आहेत. इराणी मीडिया इरना हॅक करण्यात आल्याचे समजते. आखाती देशांमध्ये आबूधाबी, बाहरीन, कुवैत, इराक, जॉर्डन, कतर, दोहा अशा अनेक ठिकाणच्या अमेरिकी सैन्यतळांवर इराणने हल्ला चढवला आहे. आखाती समुद्रात इराणी विनाशिकांनी अमेरिकेच्या तळांना घेरले असल्याचे कळते. परस्परांवरील हल्ल्यामुळे भारतातून दुबईला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान पुन्हा केरळच्या त्रिची विमानतळावर परतले. भारताने आखाती देशांतल्या आपल्या दूतावासांना एडवायजरी जारी केली असून तेथील भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले आहे. येथील नागरिकांनी बाहेर पडू नये तसेच संधी मिळताच भारतात परतावे, अशा सूचना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या आहेत.

खामेनेई

इराणने आमच्या सगळ्या ऑफर धुडकावल्या. त्यामुळे हल्ला करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. अमेरिकेच्या ताकदीला आव्हान देणाऱ्यांचे असेच हाल होणार. खामेनेईच्या सैन्याला हत्यारे टाकावी लागतील. आम्ही इराणला कधीही परमाणूशक्ती असलेला देश होऊ देणार नाही. इराणच्या नौदलाला संपवून टाकू. सध्याचे तेथील सरकार गेल्यास तिथल्या जनतेकडे कारभार सोपवला जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. रशियाने अमेरिकेच्या कारवाईविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याकडे लक्ष द्यावे, असेही रशियाने म्हटले आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content